मुख्य सामग्रीवर वगळा

जगभरात कोरोनाचा कहर ! बाधितांचा आकडा 10 लाख पार !

जगभरात कोरोनाचा कहर ! बाधितांचा आकडा 10 लाख पार !


नवी दिल्ली :  जगभरात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांचा आकडा दहा लाखांच्या पार गेला आहे. तर आतापर्यंत 50,000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एका दिवसांत कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची सर्वाधिक संख्या अमेरिकेत आहे. अर्ध्याहून अधिक जग लॉकडाऊनमध्ये असूनही कोरोनाचा विषाणू अत्यंत वेगाने फोफावत आहे. इटली, स्पेन, अमेरिका आणि ब्रिटनमधील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे.

जगभरातील मृतांच्या आकड्यात तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जगभरात 1 लाख 98 हजार 390 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 59 हजार 159 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत दोन लाख 28 हजार 923 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू इटलीमध्ये झाले आहेत. इटलीमध्ये आतापर्यंत 14,681 लोकांचा मृत्यू झाला असून 119,827 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मृतांच्या आकड्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर स्पेन असून आतापर्यंत 11,198 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 119,199 लोक कोरोना बाधित आहेत. तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. अमेरिकेत मृतांचा आणि कोरोना बाधितांचा आकडा वेगाने वाढत आहे. आतापर्यंत 7392 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 277,161 लोक कोरोनाग्रस्त आहेत. त्यामानाने भारताची परिस्थिती शासन व जनतेच्या सतर्कतेमुळें आटोक्यात असून जनतेने अजून काही दिवस खबरदारी घेवून बंधने पळलीत तर करोना भारतातून हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही अशी भावना व्यक्त करून जनता स्वयंशिस्तीने करीत असलेल्या नियमांची अमलबजावणी ही बाब भारतासाठी भूषणावह असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.

टिप्पण्या