आमदार अमोल पाटलांचा देशी मिजास !

           जिथं भिमाने बकासुराचा वध केला ती भूमी म्हणजे एकचक्र नगरी ,आणि एकचक्र नगरी म्हणजे आजचा एरंडोल विधानसभा मतदार संघ .नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत एकनाथांचे  शिलेदार ,उमदे  तरुण नेतृत्व अमोल चिमणराव पाटील यांच्या माध्यमातून एरंडोल विधानसभा मतदार संघाला मिळाले .नवखे असतानाही अवघड झालेली निवडणूक वडील माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने मोठ्या मताधिक्क्याने अमोल पाटील यांनी जिंकली आणि मात्तबर विरोधकांना मोठा आश्चर्याचा धक्का दिला . एकचक्र नगरीच्या प्रजेचा राजकीय पटलावरचा पहिला अमोलपट जनसंपर्काच्या सातत्याने व विविध उपक्रमांच्या माध्यमातून  सध्या प्रशिद्धीच्या झोतात आहे . ६ फेब्रुवारी अमोल पाटलांचा वाढदिवस .आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच एका आगळ्या वेगळ्य पद्धतीने म्हणजेच ख्यातनाम गायिका शहनाज अख्तर यांच्या हिंदुत्वाच्या भगव्या गीतांनी त्यांचा वाढदिवस त्यांचे चाहते साजरा करीत आहेत .खर तर ६ फेब्रुवारी या दिवसाचे अजून एक महत्व आणि योगायोगही असा आहे कि ,६ फेब्रुवारी १९३२ मध्ये प्रभात ने पहिल्यांदाच "अयोध्येचा राजा " हा बोलपट मुंबईच्या कृष्णा चित्रपट गृहात प्रदर्शित  केला होता .तो दिवस आणि आजचा प्रभू रामचंद्रांच्या भगव्या गीतांनी  साजरा केला जात असलेला आमदार अमोल पाटील यांचा वाढदिवस हा एक योगायोग जुळून आल्याने या कार्यक्रमाला आणि आमदार अमोल पाटील यांच्या वाढदिवसाला वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे .

 एकचक्र नगरीच्या राजकीय पटलावरच्या पहिल्या अमोलपटाची सुरुवात जशी धार्मिक विचारांनी प्रेरित होवून ख्यातनाम गायिका शहनाज अख्तर यांच्या हिंदुत्वाच्या भगव्या गीतांनी झाली आहे तशी आजची सामाजिक गरज लक्षात घेता ती माता पिता आणि लेक यांच्या नात्याची विन घट्ट जोडणासाठी प्रखर ,ज्वलंत व वास्तव विचार मांडणारे ख्यातनाम व्याख्याते वसंत हंकारे यांच्या सामाजिक जाणीवेच्या उपक्रमानेही बहरली आहे .धार्मिक विचारांना सामाजिक जाणिवेची नाड जोडत विकासाची नौका अंजनी,गिरणा ,बोरीच्या पैलतीरावर नेण्यासाठी अमोल पाटलांच्या कामाची सुरुवात अगदी पठडीतल्या राजकीय नेत्यासाराखीच सुरु आहे . मागच्या पंचवार्षिक मध्ये माजी आमदार चिमणराव पाटील यांनी ज्या पद्धतीने विकास कामांची मुहूर्तमेढ रोवली .अगदी तशीच त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल आमदार अमोल पाटील यांची राहील नव्हे तर सुरु देखील आहे अशी शास्वती मतदार संघातील जनतेला वाटायला लागली  आहे . 

 २००५ मध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून bsl ची पदवी घेतल्यानंतर अमोल पाटील याचं प्रदार्पण थेट मार्केट कमिटी ,जिल्हा बँक ,mpmc च्या माध्यमातून सहकार क्षेत्रात झाल .त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडी अडचणी ,त्यांचे प्रश्न ,त्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा अनुभव पाठीशी असल्याने विधानसभेच्या पहिल्या वहिल्या अधिवेशनात त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न ,मतदार संघातील समस्या पोटतिडकीने मांडल्या .हे पाहून मतदार संघातील जनतेला आपण योग्य प्रतिनिधी निवडून दिल्याची जशी खात्री झाली तशी वडील म्हणून चिमणराव पाटील यांचाही उर भरून आला होता आणि  पाच वर्षापूर्वीच हि संधी अमोलला द्यायला हवी होती अस नक्कीच त्यांना वाटल असाव .कारण अमोल पाटील  आमदार झाल्यापासून सतत जनतेच्या संपर्कात आहेत .समस्यांची सोडवणूक करण्याची धडपड,त्यासाठीची तळमळ ,वेगवेगळ्या संकल्पना राबविण्याच कौशल्य यामुळे  त्यांच्यातील सुप्त गुणांना वाट मोकळी करून देण्याचा निर्णय सार्थकी लागण्याच समाधान चिमणराव पाटलांच्या  चेहऱ्यावर नक्कीच पहायला मिळते .
 
आमदार अमोल पाटलांचा देशी मिजास !
 
 अमोल पाटील जरी आमदार असले तरी त्यांना बडेजावपणा पसंत नाही अस ऐकिवात आहे .मतदार संघात वावरताना जनतेशी चर्चा करताना ते खानदेशला साहित्य क्षेत्रात बहुमान मिळवून देणाऱ्या थोर कवियत्री बहिणाबाई यांच्या परंपरेचा  आदर राखत मातीशी आणि मातीतल्या माणसाशी नाळ जुडवून ठेवण्यासाठी अहिराणी भाषेचाच अधिक वापर करतात .त्यामुळे तो संवाद थेट जनतेच्या हृदयाला भिडतो .ज्यामुळे जनतेला अमोल पाटील अधिक जवळचे व आपलेसे वाटतात . जेव्हा एखादा नेता जनतेशी संवाद साधताना त्यांच्याच भाषेत बोलतो .त्यांना साजेश वाटेल अशा पद्धतीने साधेपणाने वागतो तेव्हा ते नेतृत्व जनतेला नक्कीच भावत .याची जाणीव अमोल पाटलाना नक्कीच असावी .जसा मतदार संघ विकास कमानी बहरला पाहिजे तितकाच तो जनतेची  वैचारिक प्रगल्भता देखील विकाशित झाली पाहिजे .त्यासाठी शहनाज अख्तर सारख्या नामचीन गायिका यांच्या धार्मिक ओढ निर्माण करणाऱ्या भगव्या गीतांचा कार्यक्रम असो कि , आजची सामाजिक गरज लक्षात घेता माता पिता आणि लेक यांच्या नात्याची विन घट्ट जोडणासाठी प्रखर ,ज्वलंत व वास्तव विचार मांडणारे ख्यातनाम व्याख्याते वसंत हंकारे यांच्या सामाजिक जाणीवेच्या उपक्रमाचे आयोजन असो हे देखील एक मतदार संघातील जनतेच्या बौद्धिक विकासासाठी फार मोलाचे आहे . 
.   
गावाला गाव जोडणारे रस्त्यांचे महत्वाचे प्रश्न माजी आमदार चिमणराव पाटील यांनी प्राधान्याने बहुतांशी मार्गी लावले .मोठ्या प्रमाणावर विकासकामांची गंगा मतदार संघात अवतरली .तशीच प्रलंबित व राहिलेल्या विकास कामना प्राधान्य देत जसे आबासाहेबांचे गावाला गावजोडले कि गावाचा विकास होतो हे तत्व होते अगदी त्याच धर्तीवर माणसाला माणूस जोडला कि क्रांती होते ,मनाला मन जुडले कि आपुलकी आणि प्रेम ,जिव्हाळा निर्माण होतो अन सांघीकतेने विकास सोपा होतो .हे तत्व मनी बाळगून अमोल पाटील यांची काम करण्याची पद्धत नक्कीच मतदार संघासाठी हितावह ठरो तूर्त ह्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त अपेक्षा ठेवूया आणि त्यांना त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी सुभेच्छा देवूयात . 
                 

टिप्पण्या