जळगाव : कधीकाळी म्हणजे ५ ते ६ वर्षापूर्वी चाळीसगाव तालुक्यात एका मैत्रीचा मोठा बोलबाला होता .राम लक्ष्मन ,कृष्ण सुदामा अशा अनेक उपमा देखील या जोडीला त्या काळात दिल्या गेल्या .परंतु हि एकमेव अशी मैत्री ठरली कि , दोघ मित्र विशिष्ट पदांवर स्थिरावल्यावर देखील अल्पावधीतच त्यांच्यातली मैत्री तुटली .तुटण्याचे कारण त्यांचे त्यांनाच ठावूक पण जनतेला एव्हढं नक्की माहित आहे कि ,कोण कोणाच्या गाडीत फिरत होता, कोण कोणाच्या
ताटात जेवत होता, कोण कोणाचे बोट धरून राजकारणात आले. कोण आयत्या बिळावर बसले , कोणाचे काय धंदे
होते,कोणाची किती पिढीजात श्रीमंती होती, आज कोण किती कोट्याधीश झालंय ,कोणता मित्र अल्पावधीत कोट्यवधींच्या महालात राहतोय आणि कोणता मित्र मानाची दोन पदे मिळूनही आजही भाड्याच्या घरात आहे .
शेवटी मैत्री कितीही घट्ट असली तरी आजच्या जमान्यात "स्वार्थ आणि बेईमानी " या दोन शब्दांशी दोघांपैकी एखाद पाखंडी मित्राची जर नाड जुळून गेली तर मात्र मैत्रीचे रुपांतर दुष्मनीत व्हायला वेळ लागत नाही याच उदाहरण मला वाटत चाळीसगावची जनता सध्या अनुभवत असावी . चाळिसगाव तालुक्यात आता पर्यंत अनेक जण आमदार झालेत परंतू जनतेला त्यांच्या हक्काच्या योजना त्यांच्या पदरात न टाकताही , जनतेच्या विकासा ऐवजी स्वतःचा विकास करणारा थोडा थोडका नव्हे तर अवघ्या दोन वर्षात कोट्यधीश होणारा पहिला आमदार चाळिसगाव तालुक्याला मिळाला हे या तालुक्यातील भोळ्या भाबड्या जनतेच भाग्य की दुर्भाग्य हे चाळिसगाव तालुका ठरवेल. पण त्या पेक्षाही वाईट गोष्ट घडली ती म्हणजे
घट्ट मैत्रीत गैरसमजुतीतून दुरावा आला त्याच आफ्रूप नसत .परंतु दुरावा नंतर एक मित्र जेव्हा अल्पावधीत धनाढ्य झाल्यावर सत्ता संपत्तीच्या बळावर दुसऱ्या मित्राबद्दल षडयंत्र ,कपट करून जेव्हा छळतो .ते अधिक वाईट असत .अशा वेळेला निस्शीम निरपेक्ष ,निस्वार्थ व स्वच्छ भावनेने मैत्री निभावणाऱ्या मित्राला बसलेला धक्का त्याच्या स्वतापेक्षा त्याच्या कुटुंबीयावर, तालुक्यांतील जनतेच्या मनावर अधिक खोलवर जखम करून जातो.कारण त्यांनी कोणी कोणासाठी किती त्याग केलाय हे सगळ चित्र त्यांनी जवळून पाहिलेले असते.
प्रशिद्ध गझलकार रईस अतिश साबरी यांची एक गझल फारच अंजन घालणारी आहे
साप डसे तो दोस्त बचाये ,
मगर दोस्त डसे तो कोण बचाये !
कम्बख्त "बेईमान और स्वार्थ " नाम के दो अक्षरोने
दोस्ती के नाम पर भी धब्बे लगा दिये !
त्यामुळे भाजपने उन्मेष पाटील यांच्यावर अन्याय केल्यानंतर त्यांनी ठाकरे गटात जाण्याच्या घेतलेल्या भूमिकेच समर्थन जिल्ह्यातील शेतकरी ,महिला बचत गट व युवा वर्गातून करण्यात आल होत .तद्नंतर त्यांनी चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून
उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न केलेत .ते यशस्वी देखील झालेत .उन्मेष पाटील यांना उमेदवारी निश्चित झाल्याच खात्रीलायक वृत्त जेव्हा आले तेव्हा उन्मेष पाटील
यांच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते .
गेल्या काही महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांच नेतृत्व उन्मेष
पाटील यांच्या बाबतीत षडयंत्र रचून चाळीसगाव तालुका वाशियांच्या खासदारकीचा बहुमान ओरबडल्याचे पाप ज्यांनी केल .त्या षडयन्त्री लोकांना उद्धव ठाकरे पक्षाने उन्मेष पाटील यांना उमेदवारी देवून चपराक दिली आहे अशी भावना कुटुंबियांनी त्यावेळी व्यक्तही केली होती .उन्मेष पाटील यांना राजकीय जीवनातून उठवण्याचे जे प्रयत्न झालेत .खर तर त्यांचे राजकीय जीवन संपविण्यासाठी ज्या राजकीय घडामोडी घडल्या आणि विशेष करून एकेकाळचे उन्मेष पाटील यांचे मित्र असलेल्या माणसाकडूनच षडयंत्र रचण्यात आलं .त्या विस्वासघातपणाच्या आठवणीने खर तर पाटील
कुटुंबीयांच्या डोळ्यांमध्ये अश्रू येणे स्वाभाविक होते .
ठाकरेंनी त्यांना दिलेला दिलासा कुटुंबियांसाठी नवी पर्वणी नक्कीच ठरली .यावेळी उन्मेष पाटील यांचे वडील
भैय्यासाहेब पाटील यांनी शरद पवार गटाचे नेते व उमेदवारीचे दावेदार माजी आमदार राजीव दादा देशमुख यांचे व शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे विशेष आभार मानले होते.
उन्मेष पाटील यांच्या कठीण काळात उद्धव ठाकरे यांनी त्यांना साथ दिली. आणि राजीव दादा देशमुख यांनी आपला हक्क बाजूला ठेवून मोठ्या मनाने दिलेला होकार यामुळे त्यांना गहिवरून आले होते .
“भाजपचे विद्यमान खासदार
असताना संसदीय कामकाजात उन्मेष पाटील यांची कामगिरी देशात १० व्या नंबरची असतांना देखील भाजपने काही षडयन्त्री लोकांच्या सांगण्यावरून उन्मेष पाटील यांचे जळगाव लोकसभेचे तिकीट कापले . त्यामुळे
उन्मेष पाटील यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. “उमेदवारी मिळाल्याचा आनंद कुटुंबासोबतच तालुक्यातील जनतेलाही झाला. म्हणुनच जनतेचा आज प्रचारादरम्यान उत्स्फूर्त पाठिंबा त्यांना मिळतही आहे.महत्वाचे म्हणजे चाळीसगाव तालुक्याच्या खासदारकीचा बहुमान ज्या दृष्ट लोकांनी ओरबडला त्या बद्दल खरं तर तालुक्यात्यील जनतेमध्ये तीव्र संतापही आहे .जो तो ज्याच्या त्याच्या जागेवर बरोबर असतांना एकाने दुसर्याचे पाय खेचण्याची खेकड्याची प्रव्वृत्ती जनतेला मुळीच पसंत पडलेली नाही .त्या संतापाचा उद्रेक होवून उन्मेष पाटलांच्या उमेदवारीच्या माध्यमातून जनता त्या दृष्ट लोकांना नक्की धडा शिकवेल असा सूर सध्या तरी मतदार संघात आहे .
स्वताच्या विकासापेक्षा जनतेच्या प्रश्नांना सातात्येने महत्व देवून स्वार्थाला त्यागून केवळ आणि केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेला संघर्ष त्यासाठीची तपश्चर्या आहे.संकटे आणली गेलीत ,आम्हाला कुणा सारखा कोटींचा बंगला ,एशोआरामाचे जीवन मुळीच नको ,आम्ही भाड्याच्या का होईना पण त्या घरात सुखी आहोत .हे भाड्याच्या घरात राहाण देखील कुणाला खुपत असेल अन आम्हाला झोपडीत पाठवायची इच्छा असेल तर त्या झोपडीतही मी उन्मेष पाटील यांचा संसार सुखात करायला तयार आहे . अशी भावना संपदा पाटील यांनी व्यक्त केली आहे.
परंतु भाजपकडून सातत्याने मराठा समाजाच्या होतकरू ,हुशार नेतृत्वाचे खच्चीकरण समाजाच्याच काही निर्बुद्ध लोकांना हाताशी धरून कुणी नेता करणार असेल तर समाजाच्या स्वाभिमानासाठी आम्ही सातत्याने लढा देत राहू . बहुजन समाजातील उच्चशिक्षित तरुणाच राजकीय जीवन जरी दृष्ट व्यक्तीने संपविण्याचा प्रयत्न केला असेल .तरी या संकट काळात उद्धव ठाकरे आणि रजिव दादा ह्या दोघ नेत्यांच्या सहकार्याने आणि जनतेच्या आशीर्वादाने आमची नवी सुरुवात होत
आहे”,त्यात आम्ही जनता जनार्दनाच्या आशीर्वादामुळे नक्कीच यशस्वी होवू हा विस्वास असल्याच संपदा पाटील म्हणाल्या आहेत .
वाईट एका गोष्टीचे वाटते कि ,कटकारस्थान करणारे तेच निघाले ज्यांना उन्मेष पाटील यांनी भावापेक्षाही अधिक प्रेम दिले होते . असो पाठीत खंजीर खुपसणाऱ्या लोकांना जनता नक्कीच धडा शिकवेल . “उन्मेष पाटील देशातले एकमेव असे खासदार होते जे सत्तेला
सोडून ,प्रवाहाच्या विरोधात जाण्याच धाडस करून ते सर्वसामान्यांचा ते आज आवाज बनले आहेत” असंही संपदा पाटील यावेळी
म्हणाल्या .
चाळीसगाव तालुक्यात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नगण्य अस्तित्व असतांना उन्मेष पाटील यांनी मुठभर मावळे सोबत घेवून तालुक्यात अल्पावधीत पक्षाची मोट बांधली .जनतेचा उत्स्फूर्त पाठींबा आणि आशीर्वाद उन्मेष पाटील यांना मिळत आहे . उद्धव ठाकरेंच्या पाठीत जेव्हा शिवसेनेच्या ४० गद्दार आमदारांनी खंजीर खुपसला तेव्हा त्यांना साथ देण्यात आणि त्यांना गुवाहाटीला घेवून जाण्यात चाळीसगावचे आमदार देखील सहभागी होते हि सल चाळीसगावच्या जनतेतही आहे .इतर वेळेला नौटंकी करणारा आमदार शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यावर ब्र शब्द्द सुद्धा काढत नसेल .या घटनेचा साधा निषेद व्यक्त करण्यात वरिष्ठ नेत्यांना घाबरत असेल तर शिवप्रेमींच्या हृदयावर घाव पडलेल्या घटनेला दुर्लक्षित करणारा असा पाषाण हृदयी लोकप्रतिनिधी आमच्या तालुक्याचे नेतृत्व करतो याची आम्हाला लाज वाटते . त्यामुळे उन्मेष पाटील यांचा विजय नक्की होईल अशा भावना जनतेतून व्यक्त होत आहेत .
उन्मेष दादानी थांबुन जायला पाहिजे होते घाई केली
उत्तर द्याहटवा