अस कृत्य करणाऱ्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत - राज ठाकरे

मुंबई:-- मरकजच्या कार्यक्रमावर बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. रुग्णालयात मरकजच्या सदस्यांकडून डॉक्टरांना दिल्या जाणाऱ्या असभ्य वागणुकीवर बोलताना राज ठाकरे यांनी अस कृत्य करणाऱ्या मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे असं म्हटलं आहे. मुसलमानांमधील काही अवलादी आहेत त्यांना आत्ताच ठेचलं पाहिजे असंही यावेळी ते म्हणाले. तसंच निवडणुकीच्या कुणाला मतदान करावं सांगायला येणारे मुल्ला मौलवी आहेत कुठे ? अशी विचारणाही यावेळी त्यांनी केली. निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
“मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे. यांच्यासाठी वेगळा विभाग उभा करावा आणि त्यांची वैद्यकीय उपचार बंद करायला हवे. लोकांच्या अंगावर थुकतायत का, या लोकांना  फोडून काढतानाचे व्हिडीओ व्हायरल हवेत. धर्म वैगेरे गोष्टी बोलायची ही वेळ नाही. पण मुसलमानांमधील काही अवलादी आहेत त्यांना आत्ताच ठेचलं पाहिजे. लॉकडाउन आत्ता आहे, नंतर आम्ही आहोतच,” असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
लॉकडाउनची शिस्त पाळली जाणार नाही तर अर्थसंकट निर्माण होईल अशी भीती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. लॉकडाउनची शिस्त पाळा अशी माझी विनंती आहे. यंत्रणेवर ताण आला तर सरकारवर होईल. त्यामुळे उद्योगधंद्यावर परिणाम होईल, नोकऱ्या जातील. हे सगळं आपल्या एका चुकीमुळे होणार आहे असं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. यावेळी त्यांनी इतकी शांतता आपण मुंबईच्या दंगलीतही पाहिली नव्हती असं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना त्यांनी लोकांच्या मनातील गैरसमज दूर करायला हवे होते असं म्हटलं आहे.
मुस्लीम समाजातील अनेकांची दिशाभूल केली जात असल्याच्या प्रश्नावर बोलताना राज ठाकरे यांनी यांचे मुल्ला मौलवी आहेत कुठे ? असा सवाल विचारला. निवडणुकीच्या वेळी येतात ना कुणाला मतदान करावं सांगायला, मग आता या मुल्ला मौलवींनी समोर येऊन कसं वागायला हवं ते सांगायला हवं. पण ते आता कुठे आहेत ? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. संशय येणारी स्थिती हे का निर्माण करतात असं विचारत कारलं तुपात घोळवा, साखरेत घोळवा कडू ते कडूच राहतं, तसंच आहेत हे अशी टिप्पणीही त्यांनी केली.

टिप्पण्या