लखपती अन् मालदार हमाल, बोगस ठेकेदार नेमण्याची कमाल! जिल्हा पुरवठा अधिकारी यांची सुरु आहे नुसतीच धमाल!
जळगाव- अधिकारी कुठलाही असो तो जनतेचा सेवक, प्रशासकीय कामकाजात शासनाने ठरवून दिलेल्या कायद्याच्या चौकटी पाळून आपले प्रामाणिक कर्तव्य बजावणारा व योग्य घटकाला न्याय देणारा प्रशासक म्हणून जनतेचा पाहण्याचा दृष्टिकोन असतो. परंतु जळगाव जिल्हा पुरवठा अधिकारी हे महाशय मात्र याला अपवाद आहेत. त्यांना शासनाने ठरवून दिलेले नियम, अटी, कायदे मान्य नाहीत." हम करे सो कायदा" याप्रमाणे त्यांचे कामकाज सुरू आहे. या स्वयंनिर्मित कायद्याची अंमलबजावणी करून त्यांनी" उत्कृष्ट भ्रष्ट व गैरकारभाराची नवनिर्मित संकल्पना तयार करून मोठा प्रताप रचला आहे. नव्हे तर लोकशाही तंत्राला बाजूला सारून हुकुमशाहीची अमलबजावणी सुरु केली आहे. अर्थात ते चुकीचे की बरोबर यापेक्षा त्यांच्या ह्या बद्धी कौशल्याचे कौतुक करण्यासारखे आहे. कारण त्याच्या या तंत्रपुढे शासनाचे लोकप्रतिनिधीही हतबल झाले आहेत. विशेष म्हणजे पाचोरा तालुक्याचे जबाबदार लोकप्रतिनिधी आमदार किशोर पाटील यांनी वेळोवेळी या अधिकारि संदर्भात जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्या कडे गाऱ्हाणे मांडून सुद्धा या मस्तवाल अधिकारी च्या कृतीत कुठलाही फरक पडलेला नाही.
जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांच्या गैरकारभार विषयी दिवसेंदिवस अतिरेक होत असून त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी शेतकरी सेना जिल्हा अध्यक्ष अरुण पाटील यांनी केली आहे.
पाचोरा, भडगाव व चाळीसगाव तालुक्यातील शासकीय गोदामातील हमाली कामाच्या ठेक्यासंदर्भात पात्रता नसणाऱ्या व अटी अन् शर्थी ची पूर्तता न करणाऱ्या विशेष म्हणजे ज्या हमाल मापडी सहकारी संस्थेचे कागदपत्रं बोगस असल्याचे पुरवठा अधिकारी यांना ज्ञात असतानाही आपल्या अधिकारात त्या सौस्थेला ठेका देण्याचा प्रताप घडविला आहे.
हा ठेका देताना सौस्थेच्या नोंदणीस किमान एक वर्ष झालेले असावे, सौस्थेचे कार्यक्षेत्र बाहेरील ठेका न देणे, सदर संस्थेला कामाचा किमान एक वर्षाचा अनुभव असावा, मार्केट कमिटीचा कामाच्या अनुभवाचा अधिकृत दाखला असावा, संस्थेची आर्थिक उलाढाल शासकीय नियमानुसार पात्र असावी, प्रतिज्ञापत्र अशा प्रकारे पूर्तता करणाऱ्या संस्थेला ठेका देण्याची शासकीय नियमावली आहे. मात्र हे शासनाने ठरवून दिलेली सर्व निकष धाब्यावर बसवून सुर्यवंशी यांनी स्वयं निर्मित उत्कृष्ट भ्रष्ट व गैरकारभाराची नवनिर्मित संकल्पना तयार करून बोगस संस्थेला ठेका देवून मोठा प्रताप रचला आहे. नव्हे तर लोकशाही तंत्राला बाजूला सारून हुकुमशाहीची अमलबजावणी करत दक्ष हमाल मापाडी सहकारी संस्था कुऱ्हाड खु या संस्थेला ठेका देण्यात महाशय कुठेही कचरले नाहीत.
वास्तविक सदरच्या संस्थेची नोंदणी ठेका देतेवेळी अवघी दोन महिन्यापूर्वी झालेली होती.कामाचा कुठलाही अनुभव नाही. जो अनुभवाचा दाखला दिला तोही बोगस, आर्थिक उलाढाल नाही जो चार्टर्ड अकाउंट यांचा दाखला दिला तोही बोगस, मार्केट कमिटीचा दाखला दिला तोही बोगस, जे हमाल रेकॉर्ड ला दाखवले तेही बोगस. त्यात कुणी लखपती, कुणी व्यावसायिक, तर कुणी एस टी महामंडळाचा नोकर, कुणी बलाढ्य शेतकरी तर कुणी वयाने सत्तरीच्या पार, जो स्पर्धेतल्या संस्थेच्या माघारीचे स्टॅम्प जोडले तेही बोगस, स्टॅम्प घेतला पाचोरा येथे अफेडेव्हीट केले जामनेरात ज्यांच्या बोगस सह्या दाखविल्या ती माणसं चाळीसगाव, भडगाव, पाचोऱ्याची असं एवढं बोगस असतांनाही सादर संस्थेला ठेका दिला गेला. नव्हे तर देण्याचा घाट स्वतः सुर्यवंशी यांनी रचला . एका तक्रार दाराशी बोलताना सुर्यवंशी यांचा कॉल रेकॉर्ड केला गेला आहे त्यात ते म्हणतात अरे बाबा त्यांची सगळी कागदपत्रं बोगस आहेत मला माहित आहे, सह्याही बोगस माझ्यासमोर माझ्याच आफिस मध्ये केलंय. पण मी त्याला बोललोय तुम्हाला सोबत घेण्याविषयी. असं संभाषण असलेला अडियो देखील तक्रारदरांकडे आहे. यावरून सदरचा अधिकारि किती गुर्मीत येवून गैरकारभार करीत आहे यावरून लक्षात येते.
असे करण्यामागे एका बड्या राजकीय नेत्याचा भक्कम पाठिंबा व मोठी आर्थिक देवाणघेवाण कारणीभूत असल्याची शासंकता तक्रारदारांनी व्यक्त केली आहे. सदरच्या प्रकरणाची सखोल चौकशी होवून पुरवठा अधिकारी यांना निलंबित करण्यात यावे यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांची भेट घेवून न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष अरुण पाटील यांनी साईमतशी बोलताना सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
आमच्या गल्लीमैदान न्यूज वर आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा. मो. न.8999117215