मोबाईल अंडरकटिंग रॅकेटरॅकेट चालकांच्या हालचालींवर तपास यंत्रणेची नजर!

मोबाईल अंडरकटिंग रॅकेट

रॅकेट चालकांच्या हालचालींवर तपास यंत्रणेची नजर! 

जळगाव- गल्लिमैदान न्यूज नेटवर्क वर  शहरात अनेक महिन्यांपासून सुरू असलेले मोबाईल अंडरकटिंग रॅकेट संदर्भात वृत्त प्रकाशित झाल्याने या रॅकेटचा भांडाफोड झाला आहे.

या वृत्तामुळे मोबाइल व्यवसाय क्षेत्रात  प्रचंड खळबळ उडाली असून रात्री उशिरा पर्यंत ह्या रॅकेट चालकांची धावपळ सुरु होती. त्यांच्या कडे असलेला माल दुसरीकडे हलविण्याच्या जोरदार हालचाली सुरु होत्या. मात्र या त्यांच्या हालचालींवर तपासा यंत्रणा गुप्तपणे लक्ष ठेवून असल्याचे समजते.  साईमतचा गुप्त खबऱ्या या त्यांच्या हालचालींवर काल रात्री उशिरा पर्यंत पाळत ठेवून होता. त्यांच्या गोडवून च्या आजूबाजूला चार पाच तरुण मोठं मोठया बॅगा घेऊन फिरत होते. . मात्र आपल्यावर कोणीतरी लक्ष ठेवून असल्याचे त्यांचे लक्षांत आल्यावर तीन चार तासानंतर ते तिथून निघून गेले. रॅकेट चालकांकडे  प्रत्येकी किमान कोटीच्या जवळपास किमतीचे मोबाइल हँडसेटचा  माल आजही एका गोदामात पडून  आहे.त्याची विल्हेवाट जागा बदल करून दुसरीकडे लावण्याच्या त्यांच्या हालचाली सुरू होत्या असे समजते. 
 या प्रकारामुळे शासनाचा जीएसटी व इतर कर यामाध्यमातून लाखोंचे नुकसान होत आहे. त्यात ग्राहकांची फसवणूक या गोष्टी अतिशय गंभीर असून या रॅकेट चालवणार्यांचा फर्दाफास करून ग्राहकांची फसवणूक थांबवून शासनाचा कर चुकावेगिरी करणाऱ्या या टोळीला ताबडतोब ताब्यात घेण्याची मागणी ग्राहकांकडून होताना दिसत आहे.

टिप्पण्या