जळगावात सुरु आहे मोबाईल अंडरकटिंग रॅकेट- करोडोंची उलाढाल- मात्र ग्राहकांची होतेय फसवणूक

जळगावात सुरु आहे मोबाईल अंडरकटिंग रॅकेट- करोडोंची उलाढाल- मात्र ग्राहकांची होतेय फसवणूक 
जळगाव- सध्याच्या युगात मानवाच्या जीवनात अत्यावश्यक गराजांमध्ये अन्न, वस्त्र, निवारा व्यतिरिक्त महत्त्वाची गरज मोबाईल बनला आहे. एक वेळ खायला नसेल, धड परिधान करायला वस्त्र नसेल, राहायला निवारा नसेल तर चालेल पण आधुनिक व धावपळीच्या युगात सोबत मोबाईल असणं तितकच गरजेचं बनले आहे. सध्याच्या युगात ज्या गोष्टीला अधिक महत्त्व प्राप्त होतें ती गोष्ट, ती वस्तू, तिचा काळाबाजार सुरु होतो.  चलणी मालाची डूपलिकेट हुबेहूब प्रतिकृती बाजारात  लगेच दाखल होतें. तर काही पक्क्या बिलात मिळणारी वस्तू विदाउट बिलात कमी किमतमध्ये उपलब्ध होते. हुबेहुब प्रतिकृती असलेली व कमी किमतीत मिळणाऱ्या वस्तू घेण्याकडे मग ग्राहकांना आकर्षित केले जाते. अन् ग्राहकही कमी किमतीत मिळते म्हणून सहज त्याकडे मोठया संख्येने वळतो. तेंव्हा ग्राहकांच्या आकर्षणाचा फायदा काळाबाजार करणारे घेत आसतात. असाच काहीसा प्रकार सध्या शहरात मोबाईल विक्रीत सुरु आहे. चलनी मोबाईल हँडसेट चे अंडरकटिंग मोबाईल रॅकेट जोरात सुरू असून त्यामध्यंमातून करोडोंची उलाढाल होत असल्याची खात्रीलायक माहिती गल्लिमैदानच्या हाती लागली आहे.
या बाबत मिळालेल्या माहिती नुसार हे रॅकेट चार बलाढ्य मोबाईल विक्री व्यावसायिक चालवत असल्याचे सांगितले जात आहे. एखादा हँडसेट दहा हजारांत मार्केट मध्ये पक्क्या बिलात मिळत असेल तर अगदी तसाच हुबेहुब त्याच कंपनीचा तेच मॉडेल दोन तीन हजारणी कमी किमतीत विदाउट बिलात नो ग्यारंटी, नो वारांटी या तत्त्वाने बाजारात मिळतो. ग्राहक कमी किमतीत मिळतो म्हणून तो हँडसेट घेण्याला प्राधान्य देतो. परंतू हे मोबाईल हँडसेट काही दिवस व्यवस्थित चालतात पण नंतर प्रॉब्लेम निर्माण होतो. त्याचे बिल नसल्याने व ग्यारंटी, वारंटी नसल्याने काहीच करू शकत नाही. त्यामुळे थोड्याशा स्वार्थापोटी ग्राहक फसवणुकीला बळी पडतो. हे रॅकेट चालवत असणारे व तो माल विकणारे मात्र काही दिवसांत कोट्ट्याधीस बनले आहेत. पोलिस खात्याने याबाबतीत लक्ष घालून असे रॅकेट चालविणारी टोळीचा फर्दाफास करून ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

टिप्पण्या