पाडळसे ग्रा .प. सरपंचपदी
दै .देशदुत वार्ताहर ज्ञानेश्वर तायडे यांची निवड!
यावल (काबीज शेख) तालुक्यातील पाडळसे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी दैनिक देशदुतचे पत्रकार ज्ञानेश्वर राजेंद्र तायडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली
पाडळसे ता . यावलं ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच अरुण दांडगे यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागी निवडणूक दिनांक 11 फेब्रुवारी 22 शुक्रवार रोजी पंचायत समितीच्या सभागृहात निवडणूक अधिकारी तथा मंडळ अधिकारी सौ बी यु चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशान्वये घेण्यात आली त्यात ज्ञानेश्वर राजेंद्र तायडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला त्यात सूचक म्हणून रजनीकांत पाटील तसेच सहकारी उपसरपंच खेमचंद्र कोळी सह सदस्य सुभाष भोई, सौ माधुरी पाटील, सौ भावना कोळी, सौ अनिता कुंभार, सौ स्वाती पाटील ,सौ शोभा चौधरी, सौ योगिता कोळी, यशवंत बऱ्हाटे, अरुण चौधरी, विष्णू भिल्ल हे उपस्थित होते
तसेच त्यांना देवेंद्र पाटील ,योगराज ब-हाटे (कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य )संतोष पाटील, प्रदीप कोळी, प्रमोद कुंभार ,अविनाश तायडे, मुकुंदा कोळी, मनोज पाटील, किशोर कोळी ,नरेंद्र चौधरी यांनी सहकार्य केले
निवडणूक प्रक्रियेत मंडळाधिकारी एस बी चौधरी मॅडम ,तलाठी भूषण पाटील ,ग्रामविकास अधिकारी एसटी वाघमारे, पोलीस नाईक महेश वंजारी, पोलीस पाटील सुरेश खैरनार, क्लार्क ललित चौधरी, शिपाई लक्ष्मण बराटे, यांनी प्रक्रियेत भाग घेतला
ज्ञानेश्वर तायडे हे आमचे दैनिक देशदूत चे पाडळसे प्रतिनिधी असून त्यांची नियुक्ती झाल्याबद्दल आमचे तालुका प्रतिनिधी अरुण पाटील यांनी त्यांचा सत्कार केला तर पाडळसे सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य यांनी ज्ञानेश्वर तायडे यांचा हार पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
आमच्या गल्लीमैदान न्यूज वर आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा. मो. न.8999117215