यावेत असे दिवस सुगीचे, मतदारांना पुन्हा, पुन्हा !  मग मी ही लढेन , तशा , पराभवासाठी पुन्हा, पुन्हा !!


पहिल्यांदाच काव्य रुपात काव्य वृत्त 

नुकतीच दुध संघाची निवडणूक संपन्न झाली .त्या संदर्भात 

जणू हरणारा म्हणत असावा  ,[ अंदाज अपना अपना ]

" पराभव असा व्हावा की, 

जिंकणारा जिंकूनही बावचळत रहावा!!

लागलेल्या करोडोंच्या चुन्याने  ,

तो ही विव्हळत रहावा !! १ !!

 यावेत असे दिवस सुगीचे,

मतदारांना पुन्हा, पुन्हा ! 

मग मी ही लढेन ,तशा ,

 पराभवासाठी पुन्हा, पुन्हा !! २ !!

त्यावर जिंकणारा म्हणत असावा  ,

जिंकलोच असा मी ! कि

 जसा लढलोच नाही !

 विरोधकांनाही शेवटपर्यंत 

 राज माझं कळलंच नाही !!३ !!

अखेर लक्ष्मीच्या कृपेने, जेव्हा

 त्यांची मंदावली आशा, तेव्हा

मग मी ही मागे हटलोच नाही !! ४ !!

 म्हटलं अशीही लढाई काय कामाची,

 ज्यात मी मोडलोच नाही ! 

का ? जिंकलोस असा मी ,

जसा लढलोच नाही !! ५ !!

 वाटावं समाधान हरणाऱ्यालाही,

 माझ्या त्या मोडल्याचं ! ,

 बोचत राहावं शल्य त्यालाही,

 मी सहजपणे खुडल्याच !!६ !! 

कार्यकर्त्यांसाठी आशादायी उपदेश

उसाबरोबर एरंडालाही,

 पाणी नक्की भेटीन!

दगडू सारखं नशीब ,

जवा प्रत्येकाचं उठीन !!७ !!

गाड्या बरोबर नड्याची,

 यात्रा तय आहे ! 

बस नड्या सारखं घासण्याच,

  संयम हवं आहे !!८ !!

ठगवनाराही असतो आज.

 चार जणांना धरून ,

म्हणून  छप्पर फाडके देतो ,

 तो त्यालाही वरून  !!९ !!

अभागी कार्यकर्ते

शेवटच्या क्षणाला , नात काहींच ,

गणिताशी जुडून आलं ! पण

सामाजिक अजेंड्यान 

अखेर मायनस झालं !!१० !!

येतात असे क्षण अनेक वेळेला !

कळत नाही अशा वेळेला !

 का ? भोगावे लागतात फळे !  

 पाप एकाचे अन भोग कुळेला !!११ !!

आता आपणही पाखडत जावं !

वाऱ्याच्या दिशेन !

मिळेल एक दिवस ,नक्की  भाव !

 जगावं त्याच आशेन !!१२ !!

येथे

 पक्ष कार्यास कार्यकर्ते इमानदार हवे ! अन ,

 लाभाच्या पंगतीत जेवतील हुजऱ्यांचे थवे !

 अहो ! चापलुशी,दलबदलुलाच मिळतात ,

आज सन्मानाचे दिवे ! अन 

 निष्ठेच्या पालखीला मात्र त्यांना 

 भक्तच खांदेकरी  हवे !!१३ !!  

भूखी म्हणे आता राहिली ती निष्ठा ,

करीती कुचेष्टा घरचेही !

आतातरी भज स्वाभिमान द्रष्टा,

सोसशी खस्ता कुठवरी !!१४ !!

काही कार्यकर्ते असेही असतात

कधी कधी गाड्या बरोबर चालणाऱ्याला, 

ओढण्याचा भास होतो!

तेव्हा ग ची बाधा ,

अन् मी चा वास येतो !

  खरं तर तेव्हाच त्याचा,

 स्वतःहून  ऱ्हास होतो!!१५ !!

सावधान!

हो, आता पार पडलीय ,

निवडणुक काही आदर्श ठेवून !

 "निष्ठेचा "कवचकुंडल दागिना,

 कार्यकर्त्यांनो ठेवा बर जपून !!१६ !!

सध्या चोर बाजारात म्हणे ,

'आवां 'ची गर्दी झालीय ! 

म्हणूण कदाचित शावांना,

 भेटण्यास वर्दी आलीय !!१७ !!

म्हणे , विजयाचा हा महामेरू!

ठरला बहुत जणांचा उद्धारू !!

चला ! मिळून सारे आता 

 दुधावर ताव मारू !!१८ !!

आणी हो ! हे खरंय का?

हा म्हणतो त्यान वाटली ,

तो म्हणतो त्यान वाटली !!!

वाटली का ,नाही वाटली भाऊ 

पण असं म्हणण्याची गरज,

 दोघानाही का वाटली ? !!१९  !![ नुसताच झलझला ] 

  यात ना आला, सुगंध बोटीचा,

  ना नाइंटी - थर्टीचा!

 तरीही खर्च झाला म्हने,

 कितीतरी कोटीचा !!२०  !!इति संग विसंगती अध्याय समाप्त

 असो , तरी ही एक मात्र खरं कि ,खऱ्या अर्थान नीतीमूल्य जोपासत १ रुपया न वाटताही   निवडणूक जिंकता येते.हेही या निवडणुकीच्या निमित्ताने शिद्ध झालंय .पण हे तेव्हाच शक्य आहे ,जेव्हा निवडणुकीच्या कुंडलीत सगळी ग्रह आपसात एकमेकांवर दृष्टी ठेवण्यात व्यस्त असतात तेव्हा.असाच काहीसा योग सर्व सामन्यांचे जीवापासून काम करणारे आमचे मित्र अरविंद देशमुख अन कष्टाला प्राधान्य देवून मातीशी कुस्ती खेळणारा आमचा रांगडा गडी दगडू चौधरी यांच्या बाबतीत जुळून आला अन या अस्सल सोन्यालाही मग झळाळी आली. मनापासून अभिनंदन त्या दोघांचही .

खरं तर निवडणूकीच सविस्तर विश्लेषण करणारी बातमी लिहिण्यास बसलो होतो .पण सहज काव्य सुचल अन काव्यातच व्यक्त झालो ते विश्लेषणाची जबाबदारी आपल्यावर सोडून .

आवडलं तर नक्की प्रतिक्रिया खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये लिहा .अन इतरांनाही हे काव्य वृत्त शेअर्स करायला विसरू नका . 



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

आमच्या गल्लीमैदान न्यूज वर आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा. मो. न.8999117215