अजूनही दादांच्या पुण्याईची आहे त्यांना आस !
निष्क्रियता झाकण्यास म्हणे हाच उपाय खास !
मला आठवतं एकदा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका जाहीर सभेत असं म्हटलं होतं की,एखाद्याच्या पुण्याई वर माणसानं किती दिवस जगावं यालाही काही मर्यादा असते. म्हणून कदाचित उद्धव ठाकरे यांनी मनावर घेत शिवसेनेला वेगळा आयाम दिला असावा की काय माहित नाही. परंतू त्या नंतर आत्तापर्यंत म्हणजे अगदी फूट पडल्या नंतर जे चिन्ह व पक्षाच नाव गोठवल गेलं तेव्हा जे नाव पक्षाला दिलं गेलं "उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना " .कदाचित हे नाव देवून त्यांनी स्वकतृत्वाने येणाऱ्या काळात नव्या उमेदीन उभ राहण्याच ठरवलं असावं का?असा मला पडलेला प्रश्न आहे . एकंदरित राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरे यांना जणू काही ती प्रेरणाच मिळाली की काय असा कयास निघणं स्वाभाविक आहे. पण स्वकर्तृत्व , स्वपुण्याईने प्रत्येकाला उभ राहता येतच असही नाही. कारण आज इतकी वर्ष झालीत पण स्वतः राज ठाकरे यांना अजूनतरी स्वकर्तृत्वाने निटपणे उभ राहता आल नाही. हे कदाचित राज ठाकरे विसरले असावेत. कमी काळात त्यांना जवळची माणसं सोडून गेलीत.
[संग्रहित फोटो ]
तशी फळी अजून तरी त्यांना उभारता आली नाही. की जी उद्धव ठाकरे यांना इतकी लोकं सोडून गेल्यावरही संघटना टिकवून ठेवण्यासाठी अनेकांना जवळ करत , अनेकांशी जुळवून घेत , सत्ताधाऱ्यांच्या शासकीय यंत्रणांच्या गैर वापराचा प्रचंड त्रास सहन करत, तब्बेतीची पर्वा न करताही जो संघर्ष करत आहेत. अन् त्यातून जे संघटनेचे अस्तित्व खालच्या पातळीवर आहे त्या स्थितीत किंबहुना त्या पेक्षाही अधीक जोमाने उभ करण्यासाठी पणाला लावलेलं कौशल्य नक्कीचं वाखानण्या जोग आहे. शेवटीं संघर्ष करण्याची तयारी, संघटन कौशल्य, प्रामाणिक दृष्टीकोन,वेळप्रसंगी निर्णयात बदल करुन तो सहकारी अन् कार्यकर्ते यांना पटवून देण्याची क्षमता ,त्याबद्दलचा आत्मविश्वास रुजविण्याच कसब या सगळ्या गोष्टी त्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. ज्या राज्यातल्या मोजक्या लोकात पहायला मिळतात. त्यात ज्येष्ठ नेते शरद पवार, जिल्ह्याचे नेते माजी मंत्री सुरेश जैन अन् विद्यमान स्थितीत जे प्रचंड स्ट्रगल करत आहेत ते उद्धव ठाकरे. या लोकांनी भूमिका बदलल्या , अनेकांशी प्रचंड संघर्ष केला अजूनही करत आहेत . पण सामान्य जनतेत आपली छबी टिकवून ठेवण्याचं सातत्य कायम राहिलं. स्वबळ उभ केलं . अर्थात सत्ता काळात भलेही त्यांना भाजपा सारख दबाव तंत्र कदाचित वापरता आलं नसेल किंवा ते तसं करणं त्यांच्या स्वभावात बसतही नसेल.
[संग्रहित फोटो ]
( bjp= भगाकर जबरदस्ती प्रेशर पार्टी प्रयोग असं उपरोधिक नाना पटोले का अजून कुणीतरी म्हणाल होत . कारण यात मूळ भाजपा कमी अन् हिच संख्या जास्त आहे. एखाद कंपनी अनेक कंपन्यांचा रेडिमेड माल घेते अन् आपला शिक्का मारून मार्केटिंग करते. तेंव्हा न चुकता सावधान , वैधानिक इशारा म्हणूण एक टीप लिहिते. ती टीप अशी असते की, हे प्रोडक्ट अमुक कंपनीच्या निगरानित अथवा देखरेखीखाली तयार झालेलं आहे.त्याच्यामुळे त्याच्या क्षमतेची किंवा त्याच्या गुणवत्तेची आम्ही कुठलीही हमी देवू शकत नाही. आम्हीं उत्पादक नसून विक्रेते आहोत. अगदीं तसच.कारण घावूक मध्ये घेतलेल्या मालात कॉलीटीची शास्वती जरा अवघड विषय असतो . )
[संग्रहित फोटो ]
तरीही पवार असोत कि उद्धव ठाकरे ,जैन यांच्या सारख्या लोकांनी अनेकांना मोठं केलं. काहींना लायकी पेक्षाही अधिकचा सन्मान ,तशी पद मिळवून दिली . त्यातल्याच काही लोकांनी त्यांची साथही सोडली . पण ते कधी खचले नाहीत. आज काही संधी साधू लोक सुरेश जैन यांच्या बद्दलच्या आपुलकीचे, सहानुभूतीचे,त्यांच्या पुण्याईचे लचके तोडण्यासाठी त्यांच्या दारावर झडा मारून याचना करून मनाविरुद्ध निर्णय घ्यायला भाग पाडत आहेत अशी चर्चा आहे . मध्यंतरी हेच याचक एकीकडे एकनाथ खडसे यांच वय झालंय ,त्यांनी शांत बसावं ,निवृत्त व्हाव असा सल्ला देत होते . मात्र आज दुसरीकडे दोन दिवसापूर्वी राजकारणातून निवृत्ती जाहीर केलेल्या वय वर्ष ८० झालेल्या सुरेश जैन सारख्या म्हाताऱ्याला ओढून ताणून स्क्रिप्ट वाचायला मजबूर करतात असा आरोप ठाकरे सेनेकडून करण्यातही आला . खरं तर त्यांचं उर्वरित आयुष्य या उतरत्या वयात सुखान,आनंदात परिवारासोबत जावं असं त्यांच्या सकट परिवाराचीही अपेक्षा आहे म्हणून त्यांनी काल ,परवाकडे राजकारणातून निवृत्ती देखील घेतली . त्यामुळे जो सल्ला एकनाथ खडसेंना जि लोक देतात त्यांनी सुरेश जैन यानाही द्यायला काय हरकत आहे . पण तसं ते देणार नाहीत .कारण खडसे अडचणीचे ठरतात म्हणून त्यांना निवृत्तीचा सल्ला तर जैन स्वता व त्यांच्या परिवारात कुणी राजकारणात भाग घेणार नाही हे माहित असल्याने फक्त त्यांच्या बदल जि शहरवाशियांमध्ये आपुलकी ,सहानुभूती नावाची प्रोपर्टी आहे .त्यावर त्यांचा डोळा आहे .दुसर तिसर काही नसून उल्लू साधण्याच्या हेतूने सल्ल्यात फरक आहे .
.jpeg)
[संग्रहित फोटो ]
खर तर आता सर्वांनाच सुरेश जैन याच्याबद्दल सहानुभूती ,आपुलकी निर्माण झाली होती अन आहेही . मित्र,विरोधक असं काहीही राहिलेलं नाही.ना आरोप ना प्रत्यारोप सगळं अगदी मजेत चाललय. एकेकाळचे कट्टर विरोधक खडसेंनी देखील काही दिवसांपूर्वी शहराची दुर्दशा पाहून सुरेश दादांची व त्यांच्या चांगल्या कामाची स्तुती केली होती . त्यामुळे राजकारणात भाग घेवून ज्या गोष्टी बंद पडल्याय त्या पुन्हा आरोप - प्रत्यारोपाच्या रूपाने चीघळवून या वयात मनस्ताप सुरेश दादा पदरी पाडून घेणार नाहीत असं प्रत्येकाला वाटत होत.कारण काही लोक समजतात तितके खुळे सुरेश दादा नक्कीच नसावेत .परंतु तरी देखील निवृत्ती घेतल्यावरही कधीही कागद वाचून भाषण ,प्रतिक्रिया न देणाऱ्या सुरेश जैन यांना जेव्हा स्क्रिप्ट वाचून विशिष्ट गटाला पाठींबा ,जनतेला मदतिचे आव्हाहन कोणत्या मजबुरीतून करावे लागले हे न समजण्या इतपत जनता मुळीच खुळी नाही अशी भावना जनतेत व्यक्तही होत आहे .
जैन यांच्या राजकीय विजनवास काळात जळगांव शहराची वाट लागली असा सुर शहरवासियांचा आहे.नव्हे तर ती वस्तुस्थिती देखील आहे .कधीकाळी धुळे शहराची दुर्दशा पाहून हिणविले जायचे .आज तेच धुळे विकासात कितीतरी पटीने जळगावच्या पुढे निघून गेले . त्यामुळे साहजिकच सुरेश जैन यांच्या सक्रीय सहभाग काळातली शहराची अवस्था आणि आजची शहराची ,जिल्ह्याच्या राजकारणाची अवस्था पाहून मागचा बरा होता अशी म्हणण्याची वेळ ओघाने येतेच . आता ही भावना सुरेश जैन यांच्या बाबतीत शहर वाशियांमध्ये व्यक्त होण इथपर्यंत ठीक आहे. पण त्यांच्या नंतर ज्यांच्यावर या जिल्ह्याने, शहराने शहर विकासाची, जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी सोपविली ती नक्कीच बुजगावणं नव्हती आणि नाहीतही . ति बहाद्दर मंडळी जर आज असं म्हणत असतील की शहराच्या विकासासाठी दादा हवे आहेत. मग या बहाद्दरांकडे लोकांनी सत्ता कशासाठी सोपविली होती? अन् सोपविली आहे? विकास, दादाने करावा ! अन् कार्यासाम्राटानी काय फक्तं फुशारकी मिरवावी! पद म्हणजे काय नुसतं मिरवण्याच अन् एकमेकाची जिरवण्याच साधन आहे का? पद तुम्ही भोगायची, फळ तुम्ही चाखायची, स्वतःला कार्यसम्राट, विकास पुरुष,कार्यकुशल नेतृत्व, विकासाचा महामेरू, मुलुख मैदान तोफ, संकट मोचक ही बिरुदावली मिरवायची अन विकास दुसऱ्या कोणी करायच अशी अपेक्षा का बाळगायची . "दिखणे मे अच्छे चलनेमे ढब्बू " असं का? विकास ८० वर्षाच्या दादाने करावा ही अपेक्षा या लोकांकडून व्यक्त होणं याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की या लोकांनी त्यांची निस्क्रियता,हतबलता जाहीरपणे कबूल केली आहे ! नसेल केली तर मग जर दादा विकास करू शकतात तर बाकीच्यांचा काय बुद्धिभ्रंश झालाय का ? त्यांना आजपर्यंत विकास करायला आडवल कोणी? एव्हढ्या मोठ्या उच्च कोटीच्या उपाध्या, पद तुमच्या कडे असताना आंगण वाकडं सांगायलाही त्यांचेकडे जागा नाही.अशा वेळेला आपली निष्क्रियता झाकण्यासाठी जाणून बुजून एखाद्याला टार्गेट करायचं अन सांगत फिरायचं त्याच्या मुळे ,तो होवू देत नाही ,तो अडचणी आणतो .तो ...तो ...हे किती दिवस ! आता एव्हढ फाटल्यावर त्या बिचाऱ्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला कशाला त्रास देताय .द्या कि त्यांना बी सल्ला नाथाभाऊ यांना जसा दिला होता तसा . ( लोकात सूरू असलेल्या चर्चेनुसार जर कराराने ते आले नसतील तर)
[संग्रहित फोटो ]
एखादया नेत्याची निष्क्रियता जिल्ह्याच्या विकासाच कीती वाटोळं करू शकते.त्याचे भोग जिल्ह्याला अनेक वर्ष भोगावे लागतील असं चित्र सध्या तरी आहे. एका नेत्याने तर मधल्या काळात जगात घडलं नाही तो इतिहास घडवला .खर तर त्याची गिनीज बुकात नोंद व्हायला हवी होती .मी तपासही केला पण उच्च कोटीच्या निगेटिव्ह पराक्रमाची नोंद त्यात होत नाही असं सांगण्यात आलं . अहो मागच्या वेळेस जिल्ह्याला पहिल्यांदा सहकार खात मिळाल्याच भाग्य पदरी पडलं होत . खरच योग्य अन बुद्धिवान माणसाला जर भेटलं असत तर जिल्ह्याच सहकार जिवंत झालं असत .बंद पडलेली कारखाने सुरु करून वैभव उभं करता आलं असत .अशा भावना त्यावेळी राजकीय जाणकारांमध्ये व्यक्तही झाल्या होत्या .पण दुर्दैवाने जगात आता पर्यंत जो इतिहास घडला नसेल तो इतिहास घडला. .आपली निष्क्रियता लपविण्यासाठी चक्क त्याच खात्याच्या मंत्र्याने त्याच खात्याची इज्जत चीड्या मारायची बंदूक संबोधून खात्याला हिणवण्याचा पराक्रम जगात पहिल्यांदा घडला .वास्तविक अशाही पराक्रमांची नोंद खर तर गिनीज बुकात नोंद करण्याच धोरण असायला हवं होत पण त्यातही आपलं दुर्दैव . तरी पण कुणी काहीही म्हणो , जनता मात्र खुश आहे ! . दुसऱ्यां भाऊबद्दल तर विचारायलाच नको त्यांनी तर जिल्ह्यातली सगळी धरणे पूर्ण करून जिल्ह्याचा सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढला . विरोधक कुणी काहीही म्हणो , तरीही जनता मात्र खुश आहे .जिल्ह्याच्या वैभवाला ठेच पोहचविणार होत कि काय म्हणून ते पोलीस प्रशिक्षण केंद्र निसंकोच पणे नागपूर करांच्या माथी मारलं हे अतिशय बहादुरीच काम जे कोणालाच शक्य नव्हत तेही त्यांनी करून दाखवील असही मधल्या काळात त्यांच्या बाबतीत विरोधकांकडून बोललं गेल . त्याबाबतीतही कुणी काहीही म्हणो , जनता मात्र खुश आहे .त्यांची अशी लय उच्च कोटीची कामे आहेत जि आपल्याला शब्दात मांडताही येणार नाहीत . कुणाच खच्चीकरण कसं कराव या नागपूरकरांच्या विद्यापीठाचे ते कुलगुरू आहेत म्हणे असं विरोधक म्हणतात . विशिष्ट समाजाला टार्गेट करून "तन, मन, धन ! अन आम्हीच दोन्ही जण ! " असच अभियान जणू काही सध्या जिल्ह्यात सुरु आहे असही विरोधकच म्हणतात . त्या बाबतीतही कुणी काहीही म्हणो , जनता मात्र खुश आहे . विकास काय होतच राहणार ,तो केव्हाही करता येईल .पण कुरघोड्या ,आकस ,षडयंत्र या महत्वाच्या गोष्ठी वेळच्या वेळीच कराव्या लागतात .अन्यथा त्याचा विकासावर फार परिणाम होतो .म्हणून कुणी काहीही म्हणो पण जनता मात्र खुश आहे .अर्थात असा कुण्या थोर विचारवंतांचा सिद्धांत असावा माहित नाही पण त्याला अधिकच महत्व दिल जातंय असं राज्यातल्या सध्याच्या राजकीय परिस्थिती वरून तरी वाटतंय.बाकी ते काहिही असो जनता मात्र खुश आहे. अर्थात त्याच्यातल आपल्याला फारस काही कळत नाही .शेवटी त्या मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी असतात उगाच आपण त्यात तोंड न खुपसलेलच बर . कारण जनता खूष आहे.
कंसातल( लोकात सूरू असलेल्या चर्चेनुसार जर कराराने ते आले नसतील तर) हे वाक्य भविष्यात सत्यात उतरलं तर मात्र आश्चर्य वाटायला नको .कारण कुणी काहीही म्हणो तरीही जनता मात्र खूषच राहणार ! शेवटी हा ज्याच्या त्याच्या मर्जीचा ,व्यक्ती स्वातंत्र्याचा ,निर्णय स्वातंत्र्याचा विषय आहे .त्याचही स्वागतच होणार अन जनता .........!
मन खोडाय खोडाय !
दादा पाहिजे म्हणे , शहराच्या विकासाला !
उपरती का झाली ? त्या कार्यासम्राट आसामीला !
सांगा कुठ घेवून जावं, आता
यांच्या ह्या व्यथेला !
अन् अप्रत्यक्ष अकार्यक्षमतेच्या ,
त्यांच्या त्या कबुलिला!
विकास पुरुष ,कार्यासम्राट , संकट मोचक
अन् अनाथांच्या त्या नाथाला !
मुरब्बी, मात्तबर , कार्यकुशल , अजातशत्रू,
मुलुख मैदान या पदव्यांच्या महारथींला ,
सांगा कुठ घेवून जावं त्यांच्या त्या लाचारीला !
निर्जीव बुजगावन्यामुळे
पिकाची राखण तरी होते !
शरमेची बाब ,
सजीव बहाद्दर असूनही
शहराची मात्र दुर्दशा होते!
लाज अन बूज
दोघं ठेवल्यात गहाण !
तरीही भक्त म्हणताय
आमचा नेता महान !
निस्क्रीयतेचा बाजार भरलाय
एकदम हाउसफुल !
तरीही भक्त म्हणताय
आमचा नेता लई पावरफुल !
अजूनही दादांच्या पुण्याईची आहे त्यांना आस !
निष्क्रियता झाकण्यास म्हणे हाच उपाय खास !
लय भारी
उत्तर द्याहटवा