हो ! खास दाराने आलो मी
उरी कुणाच्या बसलो नाही !
आयत्या बिळावर बसून
नाव कधी कोरले नाही !
जागलो मी, श्रमलो मी
विश्वासहर्तेला जिंकले मी !
कर्तृत्वाच्या कसोटीला
इमानदारीने टिकलो मी !
हो ! खास दाराने आलो मी, पण.......!
पेललीत मी अनेक आव्हाने
जमीन कधी सोडली नाही !
जोडलीत माणसं सोन्यासारखी
मी कळी कुणाची खुडली नाही !
हो ! खास दाराने आलो मी, पण.......!
सत्तेची अन् ऊर्मी पदाची
कधी,कुणाला दावली नाही !
आकस, कुरघोडी , षडयंत्र
मला कधी जमले नाही !
अचाट कांगावा अन हव्यास प्रसिद्धीचा
मला कधीच आला नाही !
हो ! खास दाराने आलो मी, पण.......!
श्रेय न केलेल्या कामाचे
मी कधी घेत नाही !
केविलवाणी तशी वेळ
अजून तरी आली नाही !
हो ! खास दाराने आलो मी, पण.......!
कुभांड, तोफांड , सोंग देखाव्याच
मला कधी जमले नाही !
म्हणूनही काही म्हणतात
त्याला राजकारण येत नाही !
नसतील येत दुर्बुद्धीचे खेळ मला
जनआशीर्वादाच सौख्यही काही कमी नाही !
हो ! खास दाराने आलो मी, पण.......!
पीकविमा,पोखरा, अन्य योजनापाठी
सातत्य ठेवतो शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी
जनआशीर्वादाच्या शिदोरीने संसदेत
खान्देशचा स्वाभिमान उंचावला
टॉप टेन यादीत
हो! जरी खास दाराने आलो मी........
हो चुकतो मिही कधी कधी
कबूल करायला लाजलो नाही !
रोजच फळतात षडयंत्र या मातीत
म्हणून जमिनीवर चालणं सोडलं नाही !
हक्काने टोचतात माझेही मला
पण राग कुणाचा धरला नाही !
शिकतो त्याच्यातूनही बरच काही म्हणून दुष्मनालाही फावलं नाही !
हो ! खास दाराने आलो मी, पण....... !
जाणीव आहे याची मला
सोबतीला काही न्यायचं नाही !
आज इथच होतोय हिशोब सारा
वजाबकित मला पडायचं नाही !
मिळवता आलीच थोडी जागा
हृदयात प्रत्येकाच्या , प्रयत्न तेच सही !
गर्वाने सांगतील तेही जगाला कि ,
सत्तेची नशा, त्याला अजून तरी चढली नाही !
हो ! जरी खास दाराने आलो मी,..........!
कधी उतलो नाही ! उतणारही नाही !
कधी मातलो नाही ! मातणारही नाही !
हावरटपणात हक्क कुणाचा हिरावने
माझ्या नितिमत्तेत कधी बसलं नाही!
हो ! खास दाराने आलो मी, पण.......!
प्रार्थना देवाला असते रोजच माझी
परिस्थितीच दारिद्र्य मान्य आजही
फक्त बुद्धीचं दारिद्र्य देवू नको बाबा
मला तु कधीही
हो! खासदाराने आलो मी........
..........................................
लेखक ,कवी ,चारोळीकार ,पत्रकार ,संपादक - गल्लीमैदान न्यूज ,झिंगाट वार्ता ,सैराट न्यूज
गणेश पाटील तळईकर मो .न .८९९९११७२१५
जय हिंद महासागर
उत्तर द्याहटवाजय हिन्दू महासागर
उत्तर द्याहटवा