जादू फक्त गुजरातमध्येच ? हिमाचल ,दिल्ली मनपा , लोकसभा आणि विधानसभेच्या सात पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा सफाया !

जादू फक्त गुजरातमध्येच ? हिमाचल ,दिल्ली मनपा , लोकसभा आणि विधानसभेच्या सात पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा सफाया !


उत्तर प्रदेशातील मैनपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचा पराभव होताना दिसत आहे. समाजवादी पार्टीच्या उमेदवार डिंपल यादव यांनी आघाडी घेतली आहे.

जादू फक्त गुजरातमध्येच? लोकसभा आणि विधानसभेच्या सात पोटनिवडणुकांमध्ये भाजपची स्थिती काय?

नवी दिल्ली: गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील विधानसभआ निवडणुकीचे कल समोर आले आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. तर हिमाचल प्रदेशातली सत्ता मात्र, भाजपला गमवावी लागली आहे. हिमाचल प्रदेशात काँग्रेसने सत्ता मिळवली आहे.भाजपच्या ताब्यातील दिल्ली MCD वर  आपची सत्ता आली आहे .देशात वेगवेगळ्या राज्यातील   लोकसभा आणि विधानसभेच्या सात  पोटनिवडणुकीतही भाजपला भाजपचा सफाया होताना दिसत आहे . त्यामुळे भाजपची जादू फक्त गुजरातपुरतीच मर्यादीत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

उत्तर प्रदेशातील मैनपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचा पराभव होताना दिसत आहे. समाजवादी पार्टीच्या उमेदवार डिंपल यादव यांनी आघाडी घेतली आहे. त्यांनी तब्बल 78 हजारांची आघाडी घेतली आहे. भाजपच्या रघुराज शाक्य यांना 84099 मते मिळाली असून डिंपल यादव यांना 162136 मते मिळाली आहेत. म्हणजे त्या 78037 मतांनी आघाडीवर आहेत. समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती.

रामपूर सदरमध्येही भाजप पिछाडीवर

उत्तर प्रदेशातील रामपूर सदरमध्येही भाजप पिछाडीवर आहे. समाजवादी पार्टीचे आसिम राजा हे आघाडीवर आहेत. त्यांनी भाजपचे आकाश सक्सेना यांना पिछाडीवर टाकलं आहे. राजा हे 4244 मते घेऊन आघाडीवर आहेत.

खतौलीही हातची जाणार

खतौली विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजप पराभवाच्या छायेत आहे. आलएलडीचे उमेदवार मदन भैया 8534 मते घेऊन आघाडीवर आहेत. आरएलडीच्या उमेदवाराला 3295 तर भाजपच्या उमेदवाराला 24381 मिळाली आहेत.

कुढनीतही पिछाडीवर

बिहारच्या कुढनी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप पिछाडीवर आहे. 11 व्या फेरीअखेर जेडीयूचा उमेदवार 1176 मतांनी आघाडीवर आहे. या ठिकाणी भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे.

छत्तीसगडही हाती नाही

छत्तीसगडच्या भानुप्रतापपूर जागेवर काँग्रेस भाजपला मात देताना दिसत आहे. काँग्रेसच्या सावित्री मनोज मांडवी या विजयाच्या दिशेने कूच करताना दिसत आहेत. त्या 12436 मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपचे ब्रह्मानंद नेताम पिछाडीवर आहेत. त्या शिवाय इतर दोन जागांवरही भाजप पिछाडीवर असल्याचं चित्रं आहे.

--------------------------------------------

वाचकांचे ट्विट

Evm ने क्या शानदार निकाल दिए! कोई भी नाराज नहीं! सबको जीत दिला दी!

*दिल्ली-आप

*हिमाचल-कांग्रेस

*गुजरात-बीजेपी 

* पोटनिवडणुकीत - सपा

आता सांगा EVM ला दोष देणार कोण?



टिप्पण्या

  1. हीच तर खरी चलाखी आहे, फक्त गुजरातमध्ये भाजपला जनतेचा इतका विरोध असतानाही टीव्ही आमच्या कृपाशीर्वादाने अस्तित्वाची लढाई असल्याने मारून सत्ता आणली. कारण गुजरात मधील जनतेशी चर्चा केल्यानंतर तिथली जमिनी हाकिकत इतकी भाजप विरोधी होती की भाजप ५० जागेच्या वर जाऊ शकणार नाही तेही सत्तेच्या जोरावर साम-दाम-दंड-भेदाच्या जोरावर, पण जनतेच्या मनातून उतरलेल्या भाजपला देशात ईव्हीएम घोटाळा करून सत्ता आणण्यासाठी गुजरातमध्ये आपल्याला जन्मताच पाठिंबा आहे असा खोटा भ्रम देशभरात पसरविण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत एन केन प्रकारे गुजरातची सत्ता आणायची होती प्रशासकीय यंत्र नाही त्यांच्या हातात होती त्याचा गैरवापर करून त्यांनी ते काम फत्ते केले, तुम्ही म्हणाल बाकी ठिकाणी का नाही केले बाकी ठिकाणचे निकाल नैसर्गिक येऊ दिले कारण सगळीकडेच ईव्हीएम जादू चालवली असती तर लोकांना व राजकीय पक्षांना संशय येऊन व तो बळावून बॅलेट पेपर वरच्या मतदानाच्या मागणीने जोर धरला असता, व हळूहळू त्याचे रूपांतर जनआंदोलनात होऊन शेवटी पुढील निवडणुका बॅलेट वर म्हणजेच मतपत्रिकेवर घ्यावा लागल्या असत्या हे भाजपला परवडणारे नाही कोसभर पुढे जाण्यासाठी दोन पावलं मागे येण्याची भाजपची ही चाल आहे हे वेळीच नाही ओळखले तर तिच्या मानेवर सुरी चालायला वेळ लागणार नाही.

    उत्तर द्याहटवा
  2. नाचता येत नाही म्हणे अंगन वाकडे

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

आमच्या गल्लीमैदान न्यूज वर आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा. मो. न.8999117215