सहजपने निघून गेले!
झोपलेल्यांना जागे करून
अडचण घरच्यांची वाढवून गेले!
जळगांव - जळगांव अन् रावेर लोकसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी आघाडी आणि युती या दोघांच प्रचार कार्य अगदी शांतपने सुरू होते. परंतु शिवसेनेच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी संजय राऊत आले अण शिंदे गटाला डिवचून निघुन गेले.त्यामुळे शांततेत सुरू असलेली ही निवडणूक डिवचल्यामुळे प्रचारापासून लांब असलेले शिंदे गटाचे नेते मरगळ झटकून नुसते कामालाच लागले नव्हे तर युतीच्या उमेदवारी भरण्यासाठी आलेल्या जनसमुदायाला संबोधित करताना गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांचा त्यांच्याच भाषेत चांगला समाचारही घेतला. यामुळे ठाकरे गटाला सोपी वाटणारी निवडणूक मात्र म्हणावी तितकी सोपी राहिली आहे असं सध्या तरी वाटत नाही.
तसं पाहिलं तर गत 2 वर्षा पासुन राजकीय नेत्यांचा बोलण्याचा स्तर इतका खालावलाय की त्यांना त्यांचं भान राहिलेलं नाही. आपण एका सुसंस्कृत राज्याचे लोकप्रतिनिधी आहोत , की ज्यांच्याकडे समाज मोठया अपेक्षेने, सन्मानजनक नजरेने पाहतो. याच त्यांना जराही सोयरसुतक राहिलं नाही. काहींनी तर इतक्या लाजा सोडल्या की समोर महीला बसल्या आहेत त्यांच्या समोर काय बोलावं अन् काय बोलू नये हेही कळत नाही. मला तर असं वाटतं की त्यांची चुक कमी पण ते अश्लील,असंवेदनशील , एकेरी भाषेत बोलल्यावर समोर बसलेले जेव्हा टाळ्या वाजवतात तेच अधिक दोषी आहेत. त्यांनी अशा नेत्यांना असभ्य भाषेत बोलल्यावर कधी अडवलेच नाही. उलट टाळ्या वाजवून प्रोत्साहन देत गेल्याने या लोकांची हिम्मत दिवसेंदिवस वाढत गेली.
राजकारणात कपडे बदलावी तशी पक्ष बदलणारी लोक असल्यामुळे नीतिमत्ता अन् पक्षनिष्ठा हे नियम फक्त सामान्य कार्यकर्त्यांनाच लागू आहेत.नेत्यांना नव्हे. जी काही थोडी नेते मंडळी नीतिमत्ता अन् पक्षनिष्ठा याला चिकटून आहेत त्यांना आपल्या काही स्वार्थी लोकांनी पद आणि फायद्यासाठी पक्षांतर केले की त्यांचा संयम सुटतो अन् स्वाभाविकच उद्वेगाने त्या लोकांविरुद्ध गरळ ओकायला सुरवात होते. वास्तविक जयंत पाटील सारखी अनेक राजकारणी अशीही आहेत की ते समोरच्याला शब्दाचा मार असा देतात की त्यांना सहनही होत नाही अन् सांगताही येत नाही. अर्थ तोच असतो पण त्यात अस्लीलता, किंवा अरेरावी , असंवैधानिक असं काहीच नसतं तरी पण ते समोरच्याला बरोबर झोंबत.
असभ्य, अरेरावी, असंवैधानिक भाषा तोच वापरतो ज्याच्याकडे लोकांच्या साठी काय करायचं आहे, सरकार लोकांसाठी कोणकोणत्या योजना राबवत, जनतेची प्रश्न, अडचणी, समस्या,त्या सोडवण्यासाठीच धोरण काय असलं पाहिजे. मुद्देसूद असल्या कुठल्याच विधायक गोष्टींचा कवडीचा अभ्यास नसतो . त्या मुद्यांना बगल देवून समोरचा कसा नालायक आहे हे दाखविण्याचा प्रयत्न अपशब्द वापरून केले की जणता त्या नेत्याला डोक्यावर घेते. असा समज नेत्यांचाही झाला आहे. विकास वगैरे ही सगळी अंधश्रध्दा आहे. असच काय तो बिंबवण्याचा त्यांचा प्रयत्न एकंदरीत दिसतो. इव्हेंट, नौटंकी, कुभांड, आकांडतांडव, बुद्धीभेद या मुद्यावर आजचे राजकारण सुरू आहे. हा काय बोलला, तो काय बोलला, कुणी कुणाला काय उत्तर दिलं याच्या चर्चां जनतेत होतात पण कोण विकासाच्या मुद्द्यावर, जनतेच्या प्रश्नावर बोललं याच्या चर्चा होत नाही.
संजय राऊत यांनी जो शब्द प्रयोग विरोधकांसाठी वापरला त्याच समर्थन नक्कीच नाही पण त्यांना प्रतिउत्तर म्हनून समोरच्यांनिही राऊतांच्या वक्तव्याचा आकांडतांडव करून तसाच शब्दप्रयोग करणही सयुक्तिक नाहीं. समोरच्याला दोषी ठरविताना निदान ते पत्थ विरोधकांनी पाळल असतं तर निदान ते तरी निकितमूल्यांच्या चौकटीत बसले असते.
पण यातून एक दिसून आले की, त्यांच येणं त्यांच्या उमेदवाराला फायदा कमी अन् अडचणी अधिक वाढवून गेलं. अशी चर्चा नव्हे तर खुद्द शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यातून दिसुन आलं. आम्हीं शांत होतो,प्रचारापासून लांब होतो पण राउत यांनी आम्हाला डिवचून झोपलेल्याना जागे केलं. म्हनून आम्हीं आता जोमाने कामाला लागलो. असं ते महायुतीच्या उमेदवारांच्या अर्ज भरण्यासाठी आयोजित केलेल्या मेळाव्यात बोलल्याने ठाकरे गटाला संजय राऊत यांचं येणं " नसून अडचण असून खोळंबा"या प्रकारचं झाल.
छत्रपती शिवराय शाहु फुले आंबेडकर जगदगुरू तुकोबा यांच्या सुसंस्कृत महाराष्ट्रात आपण राहतो आता यावर विश्वास बसत नाही ह्या सर्वांनी राजकारणाची वाट लावली आहे
उत्तर द्याहटवा