*घमेंड अन् माज असणाऱ्या
काही अवलादिंना नुसतं
एवढंच कळलं की,
वाघ परत येतोय!
तेव्हढ्यात त्यांची
हातभर
फाटलीय म्हणे!*
*या वाघाला घरात
येण्यापासून रोखण्यासाठी
लांडग्यांची धावपळ
सुरू झालीय म्हणे*
*पण जंगलाच्या राजाने
एलान केलंय
वाघ येणार ! म्हणजे येणार!*
राजकारण असो की, समाजकारण ! गाव असो की, मोहल्ला! सत्तेच्या,संघटनेच्या, समुहाच्या , संपत्तीच्या जोरावर मूठभर लोकांना हाताशी धरून काही माजाटलेल्या अवलादी इतक्या घमेंडी बनतात कि ते त्या क्षेत्रात ज्या बाप माणसाच्या आशीर्वादाने आलेले असतात त्याच बापाला त्याचे उपकार विसरून आव्हान द्यायला तयार होतात. पण शेवटी बाप बाप असतो. जगात कुणालाही न भिणाऱ्याला नाही म्हटलं तरी बापाचा डर असतोच. कारण त्याने अनेक पावसाळे बघितलेले असतात .संकटांचा सामना केलेला असतो. राजकारणात ,समाजकारणात तर जन्म घ्यायचा असेल, उदयास यायचं असेल तर कुणी तरी बाप माणसाचं पाठबळ, आशिर्वाद लागतातच! ..
महाराष्ट्रातील एक नेते व त्यांचे सवंगडी परत पूर्वाश्रमीच्या राजकीय पक्षात घरवापसी करणार असल्याचे वृत्त सध्या प्रसारमाध्यमात झळकत आहेत. ते जेव्हा त्याच पक्षात होते तेव्हा प्रसार माध्यमांनी त्यांना पक्ष सोडण्यास प्रवृत्त करण्यासाठी कुणाच्या सांगण्यावरून माहित नाही पण सांघिक मोहीम चालविली होती अस तेव्हाच्या मीडिया ट्रायल वरून बोललं जात होत .
कारण अगदी तशीच मोहीम प्रसार माध्यमांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे,गैरव्यवहाराचे आरोप झाल्याच्या नंतर राजीनामा देण्यास प्रवृत्त करण्यासाठी चालविली होती असंही काही जाणकार म्हणतात . खर तर त्यांची त्या पक्षासाठीची 40 वर्षाची तपश्चर्या , पक्षातील त्यांचा दरारा, थाट पाहता त्यांच्या विरोधात कुणी असं काही षडयंत्र रचण्याचे धाडस करेल हे त्यांना स्वपणातही वाटल नसाव . कारण ह्या नेत्रुवाचा दबदबाच तसा होता.विरोधकांनाही धडकी भरवणाऱ्या या नेतृत्वाचे पक्षासाठीचे कष्ट , तपश्चर्या त्यातुन उभ राहिलेलं साम्राज्य ही त्यांची फार मोठी जमेची बाजु होती.. पण .
असं म्हणतात की कोणी कितीही बलाढ्य असला तरी त्याला शेरास सव्वाशेर भेटतोच ! कालांतराने त्यांचं बोट धरून त्यांच्या मार्गदर्शनाने अ , आ, ई शिकलेल्या अन आयत्या पीठावर रांगोळी काढून ,आयत्या बिळावर विराजमान झालेल्या, की ज्यांना ह्या नेत्याने राजकीय जन्म दिला अशी लोकं सत्तेत आल्यावर सत्तेच्या धुंधित नात ,उपकार, मान मर्यादाच , वयाच भान याचा मुलाहिजा नसलेल्या काही नालायक प्रववृत्तीकडून सातत्यानं वेगवेगळी षडयंत्र रचून या नेत्याच्या संवेदनशील मनावर , हृदयावर घाव करायला सुरवात केली.( अनेकदा या नेत्याने उघडपणे तशा भुमिका मांडलेल्या आहेत त्या अनुषंगाने ) वेगवेगळ्या चौकाष्यांचा ससेमिरा लावुन मनोबल दुर्बल करण्याचा प्रयत्न सुरू झाला.दैनंदिन होणारा छळ, जाच या गोष्टी असह्य झाल्यावर शेवटी या बाप माणसालाही मन, भावना होत्याच. पण आपण निर्माण केलेलं साम्राज्य एक दिवशी सोडुन जावं लागेल हा विचार त्याकाळी कधी त्यांच्या मनालाही शिवला नसेल.
"एखाद्या कुटुंबात बापाला लई वाईट वाटतं पोरं नालायक निघाली की, म्हणून काय बाप कष्टानं उभारलेल साम्राज्य इतकं सहाजा सहजी सोडून जात नाही. कारण त्या साम्राज्यासाठी त्याने त्याचे कष्ट, त्याग, भावना, संघर्ष, मान,अपमानाची आहुती दिलेली असते. त्या त्याच्या संवेदना त्याला नेहमी त्या विचारापासून लांब ठेवत असतात . अन जाणीव करून देत असतात की , तु जे हे काही ज्यांच्या साठी उभ केलंय ते आज भलेही तुला किंमत देत नसतील. बाप म्हणून तुझा सन्मान राखत नसतील. पण उभ्या जगाला याची कल्पना आहे. कि ,तू हे साम्राज्य उभ करतांना काय खस्ता खाल्ल्या आहेत. ती भावना नेहमी सद्सद्विवेक बुध्दीला जागृत करत राहते. आणि म्हणून त्याला ते घर सोडून जाण्याच्या विचारापासून त्या भावना त्या संवेदना पुन्हा पुन्हा माघारी नेत असतात. अशीच काहीशी अवस्था त्या नेत्याची त्यावेळेला झाली असावी .
अर्थात उभ्या महाराष्ट्राने जवळून पाहिलय कि हा माणूस पक्षाचं अस्तित्व नसताना ते उभ करण्यासाठी खटारा गाडीत गाव गाव अहोरात्र फिरायचा. सोबत छोटा स्पीकर असायचा गावात एका चौकात गाडी उभी करून उभानेच पक्षाची विचारधारा मांडून लोकांना आव्हान करायचा. गावोगावी तरुणांची फौज उभी करून एका कोपऱ्यात असणाऱ्या पक्षाचं वटवृक्षात रूपांतर करून मोठं साम्राज्य, काही सहकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभ केलं ते नक्कीच सोडून जाण्यासाठी नव्हतंच .
वास्तविक पक्ष उभा करण्यात आणि त्याच्या वाढीसाठी या नेत्याने खूप खस्ता खाल्लेल्या असल्यामुळे ती नाळ इतकी सहजा सहजी तुटावी इतके त्यांचे ते श्रम, कष्ट नक्कीच बेगडीही नव्हते. बाहेर पडावं लागल्यास त्यांना हेही कळत असावं की आजपर्यंत पक्ष बदल करणाऱ्या नेत्यांची अवस्था नंतर काय झाली. अर्थात तशी अनेक उदाहरणेही त्यांच्या उशाशी होतीच. पण दुसरीकड मंत्री पदाचा राजीनामा दिल्ानंतर ते आजतागायत त्यांना जी वागणूक दिली गेली ती असह्य होती. इकडं आड तर तिकडे विहीर. शेवटी माणूस दृष्ट शक्ती कडून राजकीय हत्या होण्यापेक्षा स्वाभिमानाने राजकीय आत्महत्या करुन घेणं पसंद करतो. माणूस जगाशी लढू शकतो पण घराच्यापुढं हतबल ठरतो. काही नालायक निघाली म्हणुन काय इतरांशी जी नाती जुळलेली आसतात ती नाती कधीच तुटू नये अशी अपेक्षाही असते.परंतू परिस्थिती मजबूर करते. अन् म्हणुन नाईलाजाने शेवटी छातीवर दगड ठेवून हताश अन् हतबल झालेल्या या मनाला पक्ष सोडण्याचा टोकाचा निर्णय घ्यावा लागतो.या माणसाने ज्यांच्या विरोधात आयुष्यभर लढा दिला त्याच जेष्ठ मातब्बर दूरदृष्टीच्या बाप माणसाने या हतबल झालेल्या मनाला साद घातली. जवळ घेवुन या नेत्याच्या हुषारीची कदर करत संकटाच्या काळात साथ देत सन्मानाच स्थानही दिलं.स्वकियांविरुद्ध लढण्याचं बळ दिलं. ते शरीराने तिकडे असले तरी मन मात्र घरट्याभोवतीच फिरत होत.हे त्यांच्या सध्याच्या निर्णयावरून तरी दिसतं.
ज्या माणसाने पक्षासाठी त्याग, कौटुंबिक दुःख बाजुला सारुन खचून न जाता पक्षाला सत्तेपर्यंत पोहचवण्यासाठी जीवाचे रान केले. त्याच माणसा विरुध्द नियोजनबद्ध कट कारस्थान रचून , चौकशीचा ससेमिरा , जावया सकट अख्या कुटुंबाला छळले गेल्याने मनाला तिर्व वेदना झाल्यात. पदाच्या हव्यासापोटी राजकारणातून संपवण्याचे प्रयत्न त्यांच्याच हातून मोठे केलेल्या लोकांकडून करण्यात यावे याहून दुर्दैव ते कोणते. त्यामुळे साहजिकच मनाची उद्विग्न अवस्था होवून अशा कुटील नीतीचा अवलंब करणाऱ्या नेत्यांबाबत विरोधी पक्षात असताना त्यांच्याकडून टोकाच्या भावना प्रकट होणे स्वाभाविक होत . पण त्याच उद्विग्द्न्तेत सोडलेल्या कष्टानं उभारलेल्या घराच्या भिंती त्यांना पुन्हा पुन्हा घर वापशी करायला साद घालत असाव्या की काय म्हणुन, ज्या पक्षासाठी हाडाची काळ केली आता उतार वयात त्याच आपल्या हक्काच्या कुढीत मुठभर हाड सहारा शोधताय की,चौकष्यांच्या कुरघोड्या थांबाव्यात म्हणुन दिलासा शोधतायत हे त्याचं त्यांनाच ठाऊक.
वास्तविक तेव्हाच जर
" कभी तुम ! रिश्तों को बस इस तरह से बचा लिया करते..!
कभी मान जाया करते..कभी मना लिया करते..!"
असं केलं असतं तर नक्कीच जी पक्ष बदलाची भावना त्यावेळी जन्माला आली ती आली नसती. अन् आज जी वेळ त्यांच्यावर आली ती कदाचित आली नसती.सभागृहात, राज्यात विविध व्यासपीठावरून पक्षाच्या एखाद्या नेत्याला माझा काय गुन्हा झालाय? याच स्पस्तीकरण मागण्याची लाजिरवाणी वेळ राजकारणातल्या 40 वर्षाच्या संघर्ष वृक्षाला यावी. याहून दुर्दैव ते कोणतं.मात्र त्यांची ही हतबलता त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यालाही पचनी पडत नव्हते . परंतू खाल पासून ते वर पर्यंतच्या नेत्यांकडून त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर ना विधानसभेत शेवटच्या दिवशीच्या भाषणात मिळाल ना आजतागायत . ते कळवळून जाब विचारत होते की निदान हे सभागृह सोडुन जाताना " शेवटच्या दिवशी तरी मला सांगा कि माझा काय गुन्हा होता ? .बदनामीचा ठपका घेवून तरी मला जाव लागू नये हि माफक अपेक्षा विधानसभेत हतबलतेने व्यक्त करतांना उभ्या महाराष्ट्राने त्यांना पाहिल आहे .पण याच उत्तर पुन्हा घरवापशीची वेळ आली तरीही मिळालं नाही.
"उनको तलब थी तो हुकूमत की नशेमे,
साजिस से इनकी आँखें भी उन्होंने छिन
ली ..!.
मगर वो लोग हमेश्याके लिये इनकी
आँखों के ख़्वाब भी मांगते है ..! अर्थात या नेत्याचं जरी वय झालं असलं तरी व्हिलपॅवर, आत्मविश्वास प्रचंड आहे.ते प्रचंड अभ्यासू ,दमदार वक्तृत्व ,निर्भीड बाणा असलेल नेतृत्व .आज त्यांनी घर वापशी करण्याची घोषणा करताच त्यांच्या विषयी षडयंत्र रचणाऱ्या कुरापतखोर लोकांचे मात्र धाबे दणाणले आहे . नव्हे तर त्यांची चांगलीच हातभर फाटलिय .त्यांना माहित आहे कि वाघ जरी म्हातारा झाला म्हणून काय तो शिकार करण सोडत नाही .अन अनेक दिवसांपासून शिकारीसाठी टपलेल्या ह्या वाघाला तर आपण खूपच छळलय त्याची पहिली शिकार आपण झाल्याशिवाय राहत नाही .याची धास्ती ,प्रचंड भीती ,धडकी काहीना चांगलीच भरलीय म्हणे .त्याची येण्याची चाहूल लागल्यापासून ती बेचैन झालीत .तो आपल्या इलाक्यात येवूच नये म्हणून जोमाची विव्हरचना देखील सुरु हाय असं देखील ऐकायला मिळतंय. खऱ्या अर्थानं तस पाहायला गेलं तर राज्याच्या नेत्यांना विश्वासात न घेता राज्याच्या नेत्यांच्या नाकावर टिच्चून जर कुणाचा प्रवेश केंद्राची नेते मंडळी करत असतील तर ही स्थानिक मंडळी खपवून घेईल का? हे ही तितकंच महत्त्वाचं आहे.वास्तविक राज्यात तर सर्वानाच सोबत काम करावं लागणार आहेच.मग त्यांना डावलून कसं शक्य आहे . मात्र हे शास्वत सत्य असतानाही,राज्याच्या नेत्याच्या स्वाभिमानाला ठेच पोहचत असतानाही , त्यांना विश्वासात न घेताही जर या नेत्याला प्रवेश देण्याचा निर्णय केंद्रिय नेतृत्वाने घेतलाच असेल तर मात्र केंद्रिय नेतृत्वाच्या मनात वेगळच काहीतरी शिजतंय. या प्रवेशाला विरोध करणाऱ्या नेत्यांना केंद्रिय नेतृत्वाने सवत निर्माण करून बाजूला सारण्याचा निर्णय तर घेतला नसावा ? अशी साशंकता व्यक्त व्हायला वाव आहे. कारण हा नेता ठामपणे सांगतोय की माझा प्रवेश होणार आहे. अन् तोही वरिष्ठांच्या साक्षीने दिल्ली दरबारात.त्यामुळे या वाघाची घरवापसी वरिष्ठांनी करण्याचं ठरवलंच असेल तर कुणाचीही तमा न बाळगता घर वापसी नक्की होणार ! कारण आता दस्तुरखुद्द जंगलाच्या राजाने एलान केलंय म्हटल्यावर प्रश्नच उरत नाही .मग आता बघूया घमेंडी, अन् महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचा बट्ट्याबोळ करणारी प्रवृत्ती या वाघाला रोखण्यात यशस्वी होते कि ,वाघाची छलांग थेट यांच्या छातडावर स्वार होते हे लवकरच स्पष्ट होणार आहेच असो.येणारा काळ या घर वापसी करणाऱ्या नेत्याला सुगीचा ठरतो की अपमानित होऊन पुन्हा त्याच बाप माणसाकडे याचना करावयास भाग पाडतो हेही लवकरच समजेल.मात्र आगीतून फुफाट्यात पडल्याचा पश्चाताप त्यांनी आतापर्यंत सोसलेल्या यातना बघता करण्याची त्यांच्यावर वेळ नक्कीच येवू नये.अर्थात तशी सावधगिरीची दखल जर त्यांच्यावर साठीचा काही परिणाम झाला नसेल तर नक्कीच घेतील या सदीच्छयासह तूर्तास इतकच .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
आमच्या गल्लीमैदान न्यूज वर आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा. मो. न.8999117215