फडणवीसांचा राजकीय सुपडासाफ करण्याच जरांगेंच आव्हान अन मराठा समाजासाठीचे त्यांचे त्याग , हाल, अपेष्टा या गोष्टी मराठा समाज खरंच गांभीर्याने घेईल का?
काय आदेश द्यावेत, हे राज्याच्या गृहमंत्र्यांना कळायला हवे. माझ्या अंगावर जेसीबीतून फुले टाकली; म्हणून त्या जेसीबी मालक, चालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आणि ते जेसीबी ताब्यात घेण्यासाठी स्वतः पोलिस अधीक्षक जाऊन बसले. एवढी नीच वृत्ती आणि मराठ्यांविषयी द्वेष फडणवीस यांच्या मनात नसला पाहिजे, असा घणाघाती आरोप मनोज जरांगे पाटील यांनी परभणी जिल्ह्यातील मानवत येथे केला होता.
मानवत येथे कार्यक्रमात त्यांनी राज्य सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली होती. जरांगे पाटील म्हणाले,की, ‘मला जेलमध्ये टाकण्याचा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डाव आहे. मी माझे जीवन समाजासाठी अर्पण केले आहे.समाजाचं हीत हेच माझं एकमेव ध्येय आहे.मी सरकारच्या कुठल्याच फसव्या आश्वासनाला साद घालत नसल्याने त्यासाठीच SIT मार्फत चौकशी लावण्यात आली आहे. मात्र, आता त्यांचा कोणताही डाव यशस्वी होऊ देणार नाही. SIT च्या चौकशीला सामोरे जाण्यास मी तयार आहे असेही ठामपणे त्यांनी या सभेत सांगितले होते.
उपोषणादरम्यान अंतरवालीतील महिलांचे डोके फोडले गेले, माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. पण, समाजासाठी माझी तयारी आहे. मी गुन्हे अंगावर घेतले वेळ पडली तर तुम्हीही घ्या, पण आता मागे हटायचे नाही. त्यावेळी त्यांना आई-बहीण दिसली नाही ? माझ्या आया बहिणी धाय मोकलून रडत होत्या, त्यांच्यावर अमानूषपने लाठीचार केला गेला.हे दृश्य पाहून अख्ख्या महाराष्ट्राचं हृदय पिळवळून गेलं.पण सरकारला त्याची खंत नाही.समाजाच्या मुलांवर खोटे गून्हे दाखल करून त्यांना डांबण्यात आले .राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी SIT नेमून मराठा समाजाचे आमदार विरोधात घातले. परंतु करोडोचा मराठा समाज एकीकडे आहे. फडणवीस यांचा राजकीय सुफडासाफ केल्याशिवाय सोडणार नाही, असा इशाराही जरांगे यांनी यावेळी दिला होता. आता त्यांच्या हया आव्हानाची समाजाला आठवण आहे की नाही ते माहीत नाही. परंतु भाजपाला जाणीवपूर्वक आठवण आहे. त्या अनुषंगाने जरांगेंच्या त्या आव्हानाचा,त्यांच्या आंदोलनाचा काही परिणाम भाजपच्या उमेदवारावर होवु शकतो का? याचा अंदाज सर्वत्र भाजप घेत असल्याची चर्चा आहे.
समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणं, त्यासाठी आंदोलन करणं हा लोकशाीहिने दिलेला अधिकार आहे. जेव्हा सरकार भूलथापा देवून, वेळोवेळी शब्दांचा खेळ करून, बुद्धीभेद करून दिशाभूल करत असतं. त्यावेळी सहनशिलतेचा अंत होतो आणि अशी आंदोलने आपल्या न्याय हक्कासाठी उभी राहतात. आंदोलनातून क्रांती होते असं म्हणतात. स्वातंत्र्य लढ्याच्या माध्यमातुन भारतीयांनी ती अनुभवली आहे.
जसं आंदोलनाशीवाय स्वातंत्र्य मिळाले नाही. भारतीयांनी एकजुटीने "चले जाव चळवळ"उभारल्याने इंग्रजांना शेवटी निघून जावं लागलं. अन् पारतंत्र्यातला भारत स्वतंत्र झाला. त्याप्रमाणे मराठा समाजाला आपल्या हक्का आड येणाऱ्या इंग्रजरूपी शक्तीला गाडून टाकण्यासाठी लोकशाही मार्गाने लढा जरांगे यांनी उभारला आहे. मात्र आता समाजाने त्याच लोकशाही मार्गाने मिळालेल्या अधिकाराचा वापर करून"चले जावचा नारा" देत झूंडशाहीला तडीपार केले तरच जरांगे यांच्या आंदोलनाचे सार्थक होईल. अशा भावना मराठा समाजाच्या तरुणांमध्ये व्यक्त होतांना दिसत आहेत.
जय भवानी जय शिवाजी मराठा व OBCऐक आहे सरकारने जो अत्याचार केला विसरणया जोगा नाही हे पाप ज्यांनी केले परमेश्वर त्यांना शिक्षा करणारच
उत्तर द्याहटवा