बाप (बी) घडले, मुले (बी)घडणार ! बाभळीकडून अपेक्षा आंब्याची कशी पूर्ण होणार! माजाटलेल्या बाभळी काटेच पेरणार! आंब्यांच्या वणात आंबेच बहरणार!
बाप (बी) घडले,
मुले (बी)घडणार !
बाभळीकडून अपेक्षा
आंब्याची कशी पूर्ण होणार!
माजाटलेल्या बाभळी
काटेच पेरणार!
आंब्यांच्या वणात
आंबेच बहरणार!
असं म्हणतात की, झाडाची गुणधर्म त्याच्या फळात दिसतात. तसच बापाची गुणधर्म, त्याचे संस्कार हे मुलांमध्ये दिसतात . नव्हे तर निसर्ग धर्म आणि समाज व्यवस्थेतल्या जिवंत उदाहरणातून अनेकदा तशी उदाहरणे आपण रोजच पहातो , अनुभवतो देखील. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात तर झाडाचं मूळ वेगळं असतं पण तरीही त्यापासून निघणाऱ्या प्रजाती झाडाच्या गुणधर्म पेक्षा वेगळ्या निघतात. अशा वेळेला तो झाडाचा नव्हे तर त्यावर बाह्य संस्कारातून संकरित पद्धतीने केलेल्या तंत्रज्ञानाचाही परिणाम असु शकतो.
सध्या अपघाताची वाढती संख्या लक्षात घेता असे दिसते की, वाहनाच्या बिघाडामुळे, रस्त्यांच्या दूर्दशेमुळे होणाऱ्या अपघातापेक्षा, चालकाची बेपर्वाई,व्यसनाधीनता, सुसाट वाहणे पळविण्याची विकृती, वाहन चालविण्याच्या नियमाला फाटा देणे, ओहरटेक करण्याची विकृती यामुळे अपघातांचे प्रमाण अधिक वाढले आहेत. याला सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे सत्ता, संपत्ती, राजकीय वरदहस्त यातून आलेले माजाटलेलेपण अधिक कारणीभूत ठरत असल्याचे दिसत आहे.
हे माजाटलेलेपण पुणे आणि जळगांव येथे जे दोन अपघात झाले यातून अधोरेखितही झालं आहे. जे या ठिकाणी अपघात झाले, त्यात जे निष्पाप बळी गेलेत. त्यामुळे ह्या घटना प्रत्येकाच्या मनाला खोलवर जखम करून गेल्या. अर्थात इतकेच गंभीर अपघात दररोजच घडतात. अशा अपघातात गैर मार्गाने कमावलेल्या श्रीमंतीच्या धुंदीत असणाऱ्या बिघडलेल्या बापांच्या बिघडलेल्या अवलादीकडून कुत्र्या मांजरासारखे निष्पाप जीव रस्त्यांवर सहज चिरडून टाकले जात आहेत. पैसा, सत्तेचा माज, राजकीय वरदहस्त यामुळे अपघात करणाऱ्या अशा अवलादी तपास यंत्रणांवर दबाव आणून सहजपणे दुसऱ्या कुणावर खापर फोडून,ढकलून,धनदांडग्यांच्या मुलांची नावे वगळली जातात अन परिणामी माजाटलेल्या अवलादी मोकळ्या सोडल्या जातात . अशा पांघरून घालण्याच्या भ्रष्ट यंत्रणेच्या सहायातून त्या अवलादींना कायद्याचा धाक काय असतो याची जाणीव होण्याची कधी वेळच येत नाही. वेळीच त्यांच्या नांग्या ठेचल्या जात नाहीत . त्यामुळे त्यांची हिंमत अधिक बळावत जाते. त्यांच्या मागोमाग त्यांच्या अवलादींचीही .आणि म्हणुन असे अपघात घडून येतात. निष्पाप बळी घेतले जातात. याच सोयरसुतक, मनस्ताप ना असे अपघात करणाऱ्या अवलादीना राहिलय , ना त्यांच्या माय बापाला, ना प्रशासनाला, ना राजकारण्यांना आहे.
रामदेववाडी येथे अश्याच माजाटलेल्या अवलादिंकडून एकाच परिवारातील चार निष्पाप सदस्यांचा बळी घेण्यात आला. त्यांना ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडले.त्यांच्या गाड्यांमध्ये अंमली पदार्थ देखील मिळून आले. खुद्द पोलिसांनी ते जप्तही केले.आरोपी नशेत चुर होते. हे प्रत्यक्षदर्शींनी पाहिले. तरी देखील त्या अपघात करणाऱ्या माजाटलेल्या अवलादी निव्वळ धनदांडग्यांच्या , राजकीय वरदहस्त असणाऱ्या धेंडांच्या असल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात, वास्तव घटनेच्या सुसंगत अशी कलमे लावण्यात, त्यांना अटक करण्यात प्रशासनाने जी दिरंगाई दाखविली ती नक्कीच निषेधार्या तर आहेच. तितकीच जनमानसात संताप आणणारी देखील आहे. हे बंजारा समाजाच्या आक्रोषातून दिसुन येत आहे.
राजकीय वरदहस्त आणि संपत्तीच्या धुंदीत(बी ) घडलेल्या अवलादिंच्या बापांनी संपत्ती, राजकीय स्थान किती कष्टाने मिळविले की अनैतिक मार्गाने मिळविले आहे? या बाबतीत त्यांची पार्श्वभूमी काय आहे? हे अख्या जळगांव जिल्ह्याला चांगलेच ज्ञात आहे. हे कुणाला सांगण्याची गरज आहे असं वाटत नाही. ज्या संस्कृतीतून, संस्कारातून बाप (बी) घडले. तशीच मुलं (बी) घडणार. हा नैसर्गिक नियम आहे. जशी बाभळीच्या झाडाकडून आंब्यांची अपेक्षा मुळीच करता येत नाही. तशी सत्ता, संपत्तीच्या धुंदीत (बी) घडलेल्या बापाचे वेगळे काय संस्कार असु शकतील. बाप तसा बेटा, या म्हणीनुसार नैसर्गीक न्याय तत्त्वाने वेगळा असा दुसरा बदल पाहायला मिळणं मुळीच शक्य नाही.
रामदेव वाडीच्या चार निष्पाप बळी घेणाऱ्या एका आरोपीचा बाप काही वर्षांपूर्वी जगाला हादरा देणारा, जळगांव जिल्ह्याची इभ्रत जगभर विकणाऱ्या " सेक्स स्कँडल" प्रकरणात आरोपी होता. त्यावेळेला कोण कसे सुटले, कुणावर राजकीय वरदहस्त होता. हेही जनतेला महिती आहे. त्यामुळे खरं तर त्यांच्या पुढच्या पिढीकडून वेगळ्या अपेक्षा जनतेलाही मुळीच नव्हत्या.
हे सेक्स स्कँडल प्रकरणात काळ झालेलं तोंड कुठं तरी आता समाजात एक दोन वर्षापासून सावसुदपणाचा आव आणत धुतल्या तांदळासारख मिरायला लागल होत. निवडणुक काळात तर लय चूरू चूरु करायला लागलं होत . एव्हढच नव्हे तर ते तत्त्वज्ञानाच्या गोष्टीही करायला लागलं होत. कारण त्या काळ तोंड घेवून मिरवणाऱ्याला असं वाटतं होत की, जनता आपले सगळे उपद्व्याप विसरली आहे. वास्तवात या कलंकित माणसाला पाहिल्यावर समाजाला आजही घृणा वाटते. कारण कधीकाळी या एका नालायक माणसामुळे समाजाला मान खाली घालावी लागली होती. मोठा मनस्ताप तेव्हा समाजाने सोसला होता. अशा संतप्त भावना ह्या घटनेच्या अनुषंगाने व्यक्त होवू लागल्या आहेत.
पण भगवान के दरबार मे देर है मगर अंधेर नहीं. आज या नालायक माणसाला समाजात स्वतःच तोंड दाखवायची लायकी काल जशी नव्हती, तशी आजही नव्हती आणि भविष्यातही नसल्याचे खुद्द त्याच्याच मुलाने सिद्ध केलंय. या हरामखोर अवलादिने सत्ता, संपत्ती, राजकीय वरदहस्तच्या धुंदीत रामदेव वाडीचे चार निष्पाप जीव घेवून जो निर्दयी पणाचा कळस गाठला तो समाजमन हेलावून टाकणारा तर होताच.तसच त्याच्या गाडीत जो गांज्या सापडला ते अधिक भयानक आहे. हा गांज्या त्याच्याकडे कुठून कसा आला? कोणत्या तस्करकडून त्यांनी तो घेतला? त्याचे कोणत्या अंमली पदार्थ विक्रेत्याशी सबंध आहेत का? अंमली पदार्थ विक्रीच्या धंद्यात त्याची कुणाशी भागीदारी आहे का? त्याच्या गाडीत सापडलेला गांज्या तेव्हढाच होता? की उर्वरित माल कुणाला विक्री करून उरलेला होता? ही प्रश्न आता तपासाच्या दृष्टीकोनातून अधिक महत्त्वाची आहेत.
परंतु ज्यांचा निष्पाप बळी गेला त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातल्या राजकीय नेत्यांची इच्छाशक्ती कमी अन आरोपींना अभय देण्याचेच प्रकार सुरू असल्याची संताप जनक भावना बंजारा समाजाने व्यक्त केली आहे. एक मंत्री अपघातातील मृतांच्या भावना बोथट करण्याच्या दृष्टीकोनातून म्हणतो की आरोपींची तब्बेत सिरियस आहे. याचा अर्थ काय जे निष्पाप मेले त्यांचे त्यांना महत्त्व नाही. पण आरोपींची काळजी आहे. दूसरा म्हणतो गांजा सापडला का नाही याबाबत मला माहिती नाही. एक आमदार ढुंगण उपटून आरोपींच्या जामिनासाठी जिवापाड प्रयत्न करीत असल्याची जोरदार चर्चा आहे .यावरून लक्षात येते की जनतेचे कीती दुर्दैव आहे. ज्यांना सर्व सामान्यांच्या जीवाची पर्वा नाही. अशा नालायक लोकांना आपणच डोक्यावर घेवून नाचतो त्याच हे फळ ते जनतेला भोगायला लावत आहेत का? असा संतप्त सवाल जनतेच्या मणात निर्माण होवू लागला आहे. आर कुठं फेडाल ही पापे. ज्यांनी ज्यांनी सत्तेचा दुरुपयोग करून जनतेवर अन्याय्य केला आहे. त्यांचे दिवे लावायला देखील कुणी शिल्लक राहिलेले नाही. अशी अनेक उदाहरणे या जगात घडली आहेत. पाप फुटे आपोआप! नहीं त्याले मायबाप! जे काही बरे वाईट इथे जनतेसाठी कराल त्याचे फळ याच जन्मात "हेचि देही हेचि डोळा" याप्रमाणे डोळ्यादेखत करणाऱ्याला भोगावे लागतीलच. भोग कुणाला दैवाचा चुकला नाही.
सत्तेचा अहंकार आणि अभिमान रावणाचा टिकला नाही रावणाचा.लंका सोन्याची व्हती त्याची .३३ कोटी देव आर देव त्याच्या ताब्यात व्हतीत म्हणे . त्याचे साम्राज्य टिकले नाही. त्याच आवेशात वागणाऱ्या तेथल्या पंतप्रधानांना दोन वर्षापूर्वी जीव मुठीत घेवून स्वतःचा देश सोडुन पळून जावं लागलं. त्यामुळे आज जिल्ह्यातल्या ज्या नेत्यांना सत्तेचा अहंकार आणि माज दाटून आला आहे. त्यांना देखील याच मार्गाने एकेदिवशी जाव लागु नये यासाठी त्यांनी दुष्परिणामांचा सदसद विवेक बुद्धीने एकदा नक्की विचार करावा. रामदेव वाडीच्या निष्पाप बळी घेणाऱ्या अवलादिना अभय देवून नातेवाईकांचा तळतळा, शाप माथी मारून घेण्यापेक्षा आरोपींना अद्दल घडविण्यासाठी व भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी या घटनेवर उघडपणे तोंड उघडून भुमिका मांडली अन त्या आरोपींवर कठोर कारवाई होण्याच्या दृष्टीकोनातून भुमिका घेतली तर कूठे तरी थोडे फार पुण्य पदरी पाडता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत. तुर्तास एव्हढीच अपेक्षा.
पुढच्या बातमीत मोठा खुलासा, भयानक वास्तव नक्की मांडू. त्यासाठी आपलं "गल्लिमैदान न्यूज"पाहण्यासाठी व इतरांनाही बातमी पोहचविण्यासाठी 8999117215 हा नंबर आपल्या सर्व ग्रूप मध्ये जोडून सहकार्य करा. धन्यवाद!
.
दादासाहेब गणेश जी आपण खान्देशी भाषा शैलीत जी बातमी माहिती टिपण्णी केली आहे , हे वास्तव आहे आपण करत असलेल्या निर्भिड पत्रकारितेला आम्ही पत्रकार म्हणून आपल्या सोबत आहोत .
उत्तर द्याहटवाघडलेल्या घटनेची माहिती एकुण व वाचून मनाला चटका लावून गेली आहे.
जबरदस्त