विजय करण पवारांचाच ! लाडा लाडात उबाठाच्या विजय लाडने लावली भाजपच्या वंजारीसी 21 हजाराची पैज!


विजय करण पवारांचाच !
लाडा लाडात उबाठाच्या 
विजय लाडने लावली 
भाजपच्या वंजारीसी
21 हजाराची पैज!

जळगांव - जळगांवचे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे तालुका समन्वयक विजय रामदास लाड आणि भाजपचे मंडळ प्रमुख गजानन वंजारी हे दोघं मित्र. पण वेगवेगळया पक्षात . मात्र दोघंही त्या त्या पक्षाचे कट्टर कार्यकर्ते. सध्या लोकसभा निवडणुक सूरू आहे.त्या त्या पक्षाचे कार्यकर्ते आपला उमेदवार निवडून यावा म्हणून जोमाने काम करत आहे.जो ज्या उमेदवाराबरोबर फिरतो त्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपलाच उमेदवार निवडून येईल.

तसेच आमचाच उमेदवार निवडून येईल या वरुन या दोघा मित्रांमध्ये पैज लावण्याचे ठरले. अन् विजय लाड या ठाकरे सेनेच्या खंद्या समर्थकाने करण पवार हेच निवडून येतील या शपथेवर भाजपाच्या गजानन वंजारी याच्याशी 21000 हजाराची पैज तोंडी नव्हे तर एकमेकाला चेक देवुन घेतलीय.

कार्यकर्ता कुठल्याही पक्षाचा असो, मात्र तो जितका कट्टर अन प्रामाणिक तितकाच निष्ठावान असतो. तितके कदाचित नेतेही नसतात. घरची परिस्थिती बेताची असतांनाही कार्यकर्ते घरावर तुळशीपत्र ठेवून पक्ष प्रेमापोटी पक्षाची जिद्दीने धुरा वाहतात. वेळप्रसंगी विरोधकांशी स्थानीक पातळीवर दोन हातही करायची तयारी ठेवतात. पण हे मित्र तितके समजदारही आहेत.
यांनी घेतलेली पैज कोण जिंकत यासाठी आपल्याला 4 जुनची वाट पाहावी लागणार आहे.

कार्यकर्ता असा असतो 

भुकेल्या पोटी वाहतो निष्ठा ,
करीती कुचेष्टा घरचेही !
तरीही जपतो स्वाभिमान द्रष्टा,
सोसतो खस्ता जन्मभरी !!१ !!

निवडणुक जणू 
 त्याचा असतो सण 
पायी भिंगरी लावून 
 देतो सर्वांना आमंत्रण (२)
















टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

आमच्या गल्लीमैदान न्यूज वर आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा. मो. न.8999117215