उन्मेश पाटलांचा माष्टरस्ट्रोक ! अखेर सरकार बोलायला लागलं ! याला म्हणतात दखलपात्र नेता!




उन्मेश पाटलांचा माष्टरस्ट्रोक  ! अखेर सरकार बोलायला लागलं ! याला म्हणतात दखल पात्र नेता !

जळगांव - उन्मेश पाटलांनी कुठलंही आंदोलन हाती घेतल म्हणजे एकतर प्रश्न मार्गी लागणार किवा सरकार आणि प्रशासनाला ठोस उत्तर, ठोस आश्वासन तरी द्यावच लागणार हे समीकरण ठरलेलं आहे. अशा नेत्याला दखलपात्र नेता म्हणतात. नार पार प्रकल्पासाठी त्यांनी गिरणेच्या पाण्यात बसून केलेलं तब्बल 28 तासांच जलसमाधी आंदोलन सरकारला "बाप दाखवा नाहीतर निदान श्राद्ध तरी घाला" अशा स्वरूपाचं होत. परिणामी त्यामुळे सरकार पोपटासारख बोलूही  लागलं. पण कालच्या जळगाव येथील प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत नियोजित कार्यक्रमात  दोघं उपमुख्यमंत्र्यांच्या बोलण्यातली कमालीची तफावत हे आश्वासन धूळफेक असल्याची शाशंकता निर्माण करून गेल .त्यामुळे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भितीपोटी खान्देश वाशियांना दिलेल्या या  भेकड आश्वासनाला भुलून न जाता नार पार प्रकल्पाच्या प्रश्नासाठी निविदा निघेपर्यंत स्वस्थ बसणार नाही असा ठाम निर्धार उन्मेश पाटील यांनी व्यक्त केला आहे.
 
मुळात हा प्रकल्प केंद्र सरकारनेच हाती घ्यावा हि खान्देश वाशियांची मागणी आहे .का ? तर गेल्या ३० ते ४० वर्षात राज्याने जेही प्रकल्प हाती घेतलेत त्यांचे अजूनही ५० टक्के सुद्धा काम पूर्ण झालेले नाही .त्यात जिल्ह्यातला निन्मातापी प्रकल्प ,पदामालय क्र .२ अशी अनेक उदाहरणे राज्यातील जनतेच्या डोळ्यासमोर आहेत .त्याच एकमेव कारण म्हणजे एव्हढे मोठे प्रकल्प पूर्ण करण्याची कुवत राज्य सरकारची नाही .गुजरातला पाणी पळविण्याच्या हेतूने हा प्रकल्प नाकारून निव्वळ खान्देश वाशियांच्या डोळ्यात धूळफेक करून हा प्रकल्प रेंगाळत ठेवण्यासाठी  राज्य सरकार आणि गुजराथी नेत्यांच्या सरदारांची केविलवाणी धडपड सुरु आहे .हा खान्देश वाशियांचा प्रकल्प व्हावा व इथला शेतकरी समृद्ध व्हावा हा शुद्ध हेतू जिल्ह्यातल्या नेत्यांचा राहिला असता तर हा प्रकल्प केंद्राच्या माध्यमातून करण्याचा रेटा लावून धरला असता .पण गुजराथी नेत्यांपुढे लोटांगण घालणाऱ्या नेत्यांची त्यांच्या पुढ बोलण्याची हिम्मत नाही .लोकांनी लोकांचे संकट दूर करण्यासाठी यांना सत्तेवर बसविले आहे याचे यांना मुळीच भान नाही .ते पक्षावरील संकटे दूर करण्यात मश्गुल आहेत . असा टोला गिरीश महाजन यांचे नाव न घेता माजी खासदार उन्मेश पाटील यांनी  लगावला आहे  .
 
 ज्या अजित पवारांना  ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा प्रकरणी जेल मध्ये टाकण्याची भाषा खुद प्रधानमंत्र्यांनी केली होती .त्या अजित पवारांनी  जेल मध्ये जाण्याच्या भीतीने दुडकी धरत मोदींच्या चरणाशी लोटांगण घातले .ज्यामुळे मोदींच्या कथनी आणि करणी विषयी देशभर वाभाडे काढले गेले .नव्हे तर आजही काढले जात आहेत . अशा माणसावर आम्ही  कसा विस्वास ठेवणार .तुम्हाला खरच हा प्रकल्प मार्गी लावावा .आणि खान्देश सुजलाम सुफलाम व्हावा असे प्रामाणिकपणे वाटत असेल तर तत्काळ  त्याला मंजुरी देवून  ,त्याचे इस्टीमेट ,निविदा काढून एकरकमी निधीची तरतूद करा व सर्व विभागांच्या परवानग्या घेवून हि सगळी प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करून दाखवा मग म्हणू  की तुम्ही खऱ्या अर्थाने राज्याला  विकासाच्या दिशेने पुढे न्यायला निघाले आहेत .मग समजू की तुमची सबका साथ सबका विकासची भावना शुद्ध हेतूने प्रेरित आहे . अन्यथा तुमचा विकासाचा नारा ! अंधविस्वास सारा ! ठरेल. अशी प्रकल्पा विषयीची कळकळ व्यक्त करताना केंद्र आणि राज्य सरकारला उन्मेश पाटील यांनी विनंती वजा आवाहन केले आहे .   





टिप्पण्या

  1. दादा आपले करावे तेवढे कौतुक कमी आहे आणि कौतुक करणे म्हणजे आम्हाला तरी वाटते की आमचा नेता स्वाभिमानी आणि खरा कान्हदेशी आहे

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

आमच्या गल्लीमैदान न्यूज वर आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा. मो. न.8999117215