एरंडोल मध्ये कोणाला रोखण्यासाठी
कुणाची ठरली विव्हनीती!
कुणाची झाली डील?
कोण आहे खरा करामती ?
(सविस्तर बातमी)
जळगांव - असं म्हणतात की, राजकारणात पैसा हे साधन जरी परिपूर्ण असलं तरी त्याच्या जोडीला क्लृप्त्या, कुभांड, तोफांड आणि विव्हणीती नसेल तर ध्येय निश्चितिचे साध्यात रूपांतर करणे कठीण असते. या सगळ्या गोष्टी ज्याच्याकडे असतात त्याचा विजय नुसता सोपा नव्हे तर हमखास विजयाची खात्री देणारा असतो. विधानसभा निवडणुकीचा हंगाम जसजसा जवळ येवू लागलाय तसं तसं एरंडोल विधानसभा मतदार संघात मूळ पक्षाचे जवळ जवळ निश्चित मानले जाणारे उमेदवार सोडुन इच्छुकांचे मोहोळ उठायला सुरुवात झाली आहे. अर्थात हे मोहोळ इतक्या सहजासहजी अजिबात उठलेल नक्किच नाही असा कयास राजकीय जाणकारांचा आहे. त्यामागे एका मातब्बर नेत्याच्या क्लुप्त्या आणि व्युव्हणीतीचा तो एक भाग आहे अशी शासंकता या मतदार संघातील जाणकारांना आहे.
जसं मध पदरात पाडून घेण्यासाठी शिकारी धुकं मधाच्या पोळवर सोडुन माशांना दुभंगून मधाच साध्य करण्यात निष्णात असतो . अगदी तशीच राजकारणात यश पदरात पाडून घेण्यासाठी काही गणिते निष्णात राजकारणी अवलंबतातात .लोकांची मानसिकता दुभांगवन्यासाठी धुकं रुपी काही लोकं जनतेमध्ये सोडली जातात. शिकाराच ध्येय साध्य झाल्यानंतर सोई नुसार हे धुकं हवेत सामावून जात. वास्तविक त्या धुक्याला ना मध मिळतं. ना ज्या मधासाठी ज्याने त्याचा उपयोग करून घेतला तो त्याला पुन्हा कधी ढुंकून पाहतो.
अगदी याप्रमाणेच एरंडोल विधानसभा मतदार संघात काही धुके एका राजकीय निष्णात सिकारीने मधाच्या साध्यासाठी मोठी डील करून सोडले आहेत अशी चर्चा सध्या जोरात सुरू आहे. ठेकेदारी पद्धत जशी बांधकाम व इतर श्रमिक कामांच्या बाबतीत प्रचलीत आहे. तशी ती आता राजकारणात एखाद्याचा पराभव करण्यासाठीचा ठेका घेण्याची ठेकेदारी पद्धत ही सध्या उदयास आली आहे.नव्हे तर ती धूर्त राजकारण्यांनी मुद्दामहून स्वताच्या स्वार्थासाठी अंमलात आणलेल्या राजकीय व्युव्हनितीचा तो एक महत्त्वाचा भाग आहे.
पण अशा काही स्वार्थी, मतलबी अवलादिंमुळे जनता दिशाहीन होते व संभ्रमावस्थेमुळे त्यांच्यातली निर्णय क्षमता क्षीण पावते. परिणामी त्याचा फायदा ज्याला व्हायचा त्याला नक्की होतो. त्यामुळे राजकारणात ही पद्धत अधिक मशहूर होत आहे. असे स्वार्थी मतलबी राजकिय ठेकेदार निवडणुकीच्या हंगामात अचानक प्रकट होतात. कधीच समाज, नाती गोती याचं सोयरसुतक नसणाऱ्या या स्वार्थी, लबाड अवलादिंना निवडणुकीच्या हंगामात समाज, नाती, गोती यांचा मोठा पुळका दाटून येतो. दुरदुरून नाती काढली जातात. पैशांची उधळपट्टी केली जाते. परंतु ती मर्यादित ठिकाणी. ज्याचा ठेका घेतला आहे. त्याला जिथं मत पडणार नाहीत, ज्या समुदायाची मते मिळणार नाहीत. अशाच ठिकाणी ही मते विभागण्यासाठी हे राजकारणातले ठेकेदार अधिक भर देतात. ज्याचा ठेका घेतला आहे. त्याला शिव्याही देतील. मुळात त्यांना तशी मुभा स्वतःहून ज्याने ठेका दिला आहे त्याने दिली असते. कारण त्याशिवाय सबंधित समुदायाचा विश्वास या ठेकेदारावर बसणार नाही हे त्याला चांगल महिती असतं.
एव्हढच नाही ठरलेल्या ठेक्यामधून कीती टक्के रक्कम खर्च करावी आणि किती टक्के रक्कम स्वतः ठेवावी याचीही गणिते ठरलेली असतात. बिचाऱ्या सर्वसामान्य जनतेला या आतल्या गोष्टी माहीत नसतात. किंवा त्यांच्या त्या ध्यानात येवू नये म्हणुन तशी खबरादारीही घेतली जाते. विशिष्ट समुदाय फक्त आणि फक्त ठेकेदाराशी कसे एकनिष्ठ जुळून राहतील यासाठी त्यांचा बुद्धिभेद करून त्यांना एकजुटीने बांधून ठेवण्यासाठी गावोगावी काही सब ठेकेदार ही नेमलेले असतात. त्यामुळे आपल्यातलाच एक जवळचा, स्थानिक व्यक्ती जे काही सांगतोय ते सत्य आहे. यावर ते लोकं विश्वास ठेवतात. अर्थात तो ही तितकाच हुषार, चाणाक्ष असतो.आपण सब ठेकेदार आहोत याची जराही चुणूक गावातल्याना लागू देत नाही.असो .
सर्वात महत्त्वाचं म्हणजे एरंडोल हा तालुका एरंडोलीसाठी राज्यभर (तडजोड) प्रसिद्ध आहे. अर्थात ही तडजोड वादातीत परिस्थितीत, व्यवहार जुळवून आणण्यासाठी खरं तर उपयोगात आहे. परन्तु काही वर्षांपासून बाहेरच्या काही घुसखोर लोकांमुळे ह्या एरंडोलीचा वापर राजकारणातही वाढल्याने एरंडोल तालुका विकासापासून खूपच वंचीत राहिला आहे. याची खंत ना येथील राजकारण्यांना आहे .ना जनतेला आहे.
खान्देशात माझा एरंडोल तालुका पाण्याचा सर्वात श्रीमंत तालुका व्हावा हे स्वप्न उराशी बाळगून काम करणारे माजी आमदार महेंद्रसिंह पाटील हे या एरंडोली आणि राजकिय ठेकेदारीचे पहिले बळी ठरलेत.
अंजनी प्रकल्प, पद्मालय क्र.2, खडकेसिम, पातरखेडा, मुगपाठ हे एरंडोल तालुक्यातले त्यांच्या साडेचार वर्षांच्या कालावधीतले सिंचन प्रकल्पांच्या कामाचे फलित. तद्नंतर तब्बल तिस वर्ष उलटूनही किरकोळ राहिलेले काम पूर्ण करण्याची दानत कुणा मायच्या लालने दाखविली नाही. 10 वर्ष एका थापाड्याच्या थापा पलीकडे पदरात काहीच पडलं नाही. दुसऱ्याने वयाच भान विसरुन स्वताच्या स्वार्थासाठी मतदारांच्या भावनांची तस्करी करून बाजार मांडला, ज्यामुळे मतदार संघाच्या इभ्रतीचे धिंडवडे देशभर निघाले.तर तिसऱ्याने पहील्याची पुनरावृत्ती केली.परिणामी एका चांगल्या नेतृत्वाला बाजूला सारण्याचे व तालुक्याला सिंचन प्रकल्पाच्या लाभापासून वंचित ठेवण्याचे पातक अशाच त्यावेळच्या राजकिय ठेकेदारांनी केले. ठेकेदारांचे भले झाले. मात्र जनता आजही एरंडोल तालुक्याची शेती सिंचनासाठी आसुसलेलीच आहे.
जितकी गरज सत्तेची काम करणाऱ्या नेतृत्वाला असते. त्यापेक्षाही कितीतरी पटीने असं नेतृत्व टिकवून ठेवण्याची गरज जनतेलाही असावी लागते. अशी नेतृत्व राजकरणातून बाजूला गेली तरी त्यांच्या परिस्थितीवर काहीच परिणाम होत नाही. परिणाम होतो. तो तालुक्याच्या विकासावर, जनतेच्या जीवनमानावर. महत्त्वाच्या प्रकल्पांवर. असं म्हणतात "जल है तो कल है! "पाणी हेच जिवन " पाणी असलं की सर्व समस्या आपोआप सुटतात.
सांगायचं तात्पर्य असं की, निदान आतातरी एरंडोलच्या जनतेने तालुक्याचे वाटोळे करणाऱ्यास कारणीभूत ठरणाऱ्या अशा राजकीय ठेकेदारांना खतपाणी घालण्यापेक्षा, आणि निस्क्रियतांना वर्षानुवर्ष उरावर बसवून तालुका खाईत लोटण्यापेक्षा तालुक्यातलं एक स्वतःच चांगल अस हुशार, कर्तव्यदक्ष नेतृत्व उदयास आणण्याची गरज आहे. तालुक्याची गरज लक्षात घेता, अडगळीला टाकलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याकरिता स्वाभिमान बाजूला ठेवून, पक्षीय जोडे, गटतट बाजूला ठेवून एकजुटीने तालुक्याच्या,मतदारसंघाच्या भल्यासाठी आता एक होण्याची वेळ आहे.
माजी आमदार महेंद्रसिंह पाटील यांना आता राजकरणात रस नसेलही कदाचीत.पण तालुक्याची गरज म्हणुन का होईना पुन्हा एकदा त्यांना साद घालण्यास हरकत नाही.त्यांचे वक्तृत्व , कर्तृत्त्व,विकासाचा दृष्टिकोन, त्यासाठीचा प्रचंड अभ्यास या सगळया गोष्टी बघता तालुक्याच्या भवितव्यासाठी ती आज गरज आहे. आणि त्यासाठी त्यांचेकडे पुरेसा वेळही आहे.तालुक्याच भवितव्य हे एकच ध्येय ठेवलं तर त्यामुळे कुणाच्या नाकाचा सेंडा कमी व्हायचही कारण नाही.
ते नाही म्हणत असतील तर ज्यांनी एक कर्तृत्ववान व्यक्ती म्हणुन जिल्हाभरात छबी निर्माण केली आहे. अशा नव्या दमाचे तरूण, तडफदार, अभ्यासू , मनमिळावू नेतृत्व म्हणून नाना पोपट महाजन आपल्याकडे सक्षम असा दुसरा पर्याय आहे. शेवटी हेही जमत नसेल तर महेंद्रसिंह पाटील यांच्या सारखाच पाण्याचा प्रचंड अभ्यास असणारे, नार पार साठी अनेक दशकांपासून पाठपुराव्याच सातत्य ठेवणारे ऍड विश्वासराव भोसले यांच्यासारख्या हुषार व अभ्यासू नेतृत्वाला मतदारसंघाची गरज अन् पुढच्या पिढ्यांच्या भवितव्यासाठी साद घालावयासही कुणाची हरकत असणार नाही.
यासाठी गिरड आमदडे गट आणि एरंडोल तालुका मधील सर्व पक्षियानी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अभी नहीं तो कभी नहीं.30 वर्षांपासून बेदर्दी , निष्क्रिय व प्रकल्पाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करणारे नेतृत्व झेलण्यापेक्षा आपले दुःख, भावना यांची जाणीव असलेले वरील तिघांपैकी एक कुणीही कधीही मतलबी राजकारण्यांपेक्षा नक्किच सरस ठरतील. याची जाण ठेवून पुन्हा राजकीय ठेकेदारांना खतपाणी घालण्यापेक्षा हा प्रयोग एरंडोल तालुका व गिरड आमदडे गटातील सर्वच राजकिय पक्षांच्या,संघटनांच्या, सहकारी संस्थांच्या पदाधिकारी यांनी मनावर घेतल्यास नक्किच यशस्वी होईल अशी अपेक्षा आता सर्व सामान्य जनतेलाही वाटते. असो तुर्तास इतकेच. पुन्हा भेटू निवडणुकीच्या रिगणात. अनेक राजकीय ठेकेदारांच्या 7/12 सकट सडेतोड व निर्भीड, निःपक्ष वृत्तासोबत. तो पर्यंत उघडा डोळे! राहू नका भोळे! बाजुला ठेवा राजकीय जोडे अन् राजकीय ठेकेदारीला शिकवा धडे!
भाऊ खूपच मार्मिक विचार मांडले आपण.आम्ही तुमच्या विचाराशी सहमत आहोत व सर्व एरंडोल तालुका व गिरड परिसर बापूसाहेब,भोसले काका व नाना भाऊ यांच्या पाठीशी राहील अशी आशा करतो.
उत्तर द्याहटवाएरंडोल आमदार गिरणा काठवर लक्ष देणार की,नाही?भातखेडे,पिंपरी सिम,दहिगांव रस्ता होणार की नाही?काम न करणार्यांना घरचा रस्ता दाखवा!🚩💐👏
उत्तर द्याहटवातालुक्याचा विचार व्हायला पाहिजे आणि तालुक्याचा विकास तालुक्याचे नेतृत्व करणारेच पाहिजे आम्ही तुमच्या विचाराशी सहमत अहोत दादा धन्यवाद.
उत्तर द्याहटवा