- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
जळगाव : "वादळ, पाऊस शिवसैनिकाला थांबवू शकत नाही. त्यामुळे कालचा टपरीवाला आपल्याला काय थांबवणार? टपरीवर बसवायचं की जेलमध्ये बसवायचं? व्यवस्थित अभ्यास करून फाईल तयार केलेली आहे. ज्या ईडीला घाबरून तुम्ही तिकडे पळाले, असं सांगतात. तीच इडी तुमच्याकडे येणार आहे, तुम्हाला कोणीच वाचू शकणार नाही", असे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. ते जळगावमध्ये बोलत होते. यावेळी बोलताना संजय राऊतांनी मंत्री गुलाबराव पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला. मंत्री गुलाबराव पाटील यांना जेलमध्ये टाकण्याचा इशाराही संजय राऊत यांनी जाहीर भाषणातून दिला.
जे गद्दार तिकडे पळाले, ते ईडीकडून वाचणार नाहीत
संजय राऊत म्हणाले, इडीची फाईल बंद होत नाही, ती टेबलावरून कपाटात जाते. आमचं सरकार आलं अनेक फाईली कपाटातून टेबलावर येणार आहेत. जे गद्दार तिकडे पळाले, ते ईडीकडून वाचणार नाहीत. या गुलाबरावांना आता त्या गुलाबरावांसाठी डबा घेऊन जावे लागेल. जळगाव जिल्ह्यात गद्दारीचे अडीचशे कोटी आले. यांना कोणी शाखाप्रमुख केलं नसतं. मातीतून उचलून शिवसेनेने मोठे केलं. मात्र हे शिवसेने सोबत बेईमान झाले. पाणी खात्याचे मंत्री आपल्या मतदारसंघांमध्ये पंधरा पंधरा दिवस पाणी देऊ शकत नाही. त्यांना मिळणारे संध्याकाळचे पाणी कोणत्या ठिकाणाहून येतं ते टक्केवारीचे पाणी आहे म्हणतात.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कमी आणि दिल्लीचे लाचार जास्त
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, ज्या जागा शिवसेनेच्या होत्या त्या आपण लढायलाच हव्या आणि जिंकायला हव्या. उत्तर महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. जळगाव जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या घरात जाऊन त्याचे अश्रू पुसण्याचे प्रयत्न केलेला नाही. शिंदे मुख्यमंत्री कमी आणि दिल्लीचे लाचार जास्त आहेत. महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या चरणी गहाण टाकला आहे. तुम्हाला मंत्री म्हणून रोजगार मिळाला. तुमच्याकडे पाणी खात आहे, पाण्यासारखा पैसा आहे. डांबर, माती, वाळू अशा सर्व ठिकाणाहून तुम्ही पैसे खात आहात, असा आरोप संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर नाव न घेता केला.
लोकसभेचा निकाल काय लागला ते विसरून जा. या जिल्ह्यामध्ये लोकसभेत भाजपचे जवळपास दोन लाख मतं कमी करण्याचे काम आपण केलं आहे. ज्या जळगाव जिल्ह्यातल्या सर्व जागा महाविकास आघाडी जिंकणार आहे. ज्या जागा शिवसेनेच्या आहेत, त्या जागा शिवसेना जिंकणार, असंही राऊत म्हणाले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
आमच्या गल्लीमैदान न्यूज वर आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा. मो. न.8999117215