गृहमंत्री सत्तेच्या नशेत मश्गूल! तर ते पोलीस मद्याच्या नशेत मश्गूल! रक्षकच झालेत सवयीने लाचार कसे थांबतील रे देवा? इथले अन्याय अत्याचार
- गृहमंत्री सत्तेच्या नशेत मश्गूल! तर
- ते पोलीस मद्याच्या नशेत मश्गूल!
- रक्षकच झालेत सवयीने लाचार!
- सांग कसे थांबतील रे देवा ?
- राज्यातले अन्याय अत्याचार !
जळगाव शहरात २५ ऑगस्ट रोजी भरदुपारी बारमध्ये गणवेशातच बसून तर्रर्र झालेल्या पोलिसांमध्ये जोरदार वाद झाला. त्यानंतर दोघं पोलिसांमध्ये हाणामारी झाली. त्याचा व्हीडिओ समोर आला आहे. पोलिसांच्या हाणामारीचा सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी झाली ते पोलीस जळगावात बंदोबस्तासाठी आल्याची माहिती मिळाली. ते जळगाव जिल्ह्यातीलच असल्याचे सांगण्यात येत आहे.
बारमध्ये ग्लास फोडले
रविवारी दुपारी भास्कर मार्केट परिसरातील एका बारमध्ये पोलिसांनी मद्यपान केले. हे पोलीस बारमध्ये बसलेले असताना त्या ठिकाणी दोन ग्लासही त्यांनी फोडले. त्यानंतर संध्याकाळी साडेपाच ते पावणे सहावाजेदरम्यान बाहेर आल्यानंतर त्यांच्यात आपसात वाद झाले. बराच वेळ त्यांच्यात बाचाबाची सुरू होती. हा वाद वाढतच जाऊन तिघे जण एकमेकांना भिडले व चांगलीच पकडापकडी झाली. त्यात एक जण तर चिखलातही पडला.
मुलाला धडक देत पसार
पोलिसांच्या गाडीत चालक असलेला पोलीस कार काढताना दोन दुचाकींना धक्का दिला. त्यामुळे त्या दुचाकी पाडल्या. त्यानंतर काही अंतरावर जाऊन एका सायकलस्वार मुलाला धडक देत पसार झाल्याची घटना यावेळी घडली. सुदैवाने यात मुलाला मोठी दुखापत झाली नाही.
वाद एकाचा दोघांनी त्याला आवरले
हॉटेल बाहेर वाद होत असल्याची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलिसांनी देखील त्याठिकाणी धाव घेतली होती. पोलिसांनी माहिती घेतली असता संदीप धनगर नामक कर्मचारी हॉटेलमध्ये आणि बाहेर वाद घालत होता. इतर दोघे कर्मचारी त्याची समजूत काढत होते तर त्याला आवर घालत होते मात्र तरीही तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.
निलंबन करुन चौकशी लागणार
हॉटेलमध्ये बसलेले कर्मचारी बंदोबस्त आटोपून त्याठिकाणी बसलेले होते. वाद घालणारा कर्मचारी पोशाख घालून असल्याने त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. तसेच या प्रकरणाची वैयक्तिक चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.
गुन्हेगारांना पोलिसांविषयी भीतीच राहणार नाही यांना तात्काळ कायमस्वरूपी निलंबित करावे
उत्तर द्याहटवा