ये हुई ना बात! अहो मी स्वतःची बदनामी करण्याची जाहिरात कसा आणी का देवू? निवडणुक आयोगाला शिवराम पाटलांचा खडा सवाल?



जळगांव शहर विधानसभा निवडणुकीत सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील हे उमेदवार आहेत. ते अनेक वर्षापासून भ्रष्टाचार विरुद्ध निर्भिडपणे लढा लढत आहेत. विकासाच्या नावाखाली होणारी निकृष्ट दर्जाची कामे आणि त्यात होणारा प्रचंड भ्रष्टाचार याविषयी त्यांनी अनेक आंदोलने देखील केलीत. प्रशासनातील अनेक गैरप्रकार, भ्रष्टाचार त्यांनी चव्हाट्यावर मांडलेत.पण प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची मिलीभगत असल्यामुळे शिवराम पाटील यांचा आवाज सातत्यानं दडपण्यात आला.

 शिवराम पाटील हे चांगले काम करीत आहेत. त्यांचा असलेला प्रचंड अभ्यास या सगळया गोष्टी जनतेला पटतात.पण जनता म्हणावी तशी सोबत करत नाही ही खंत त्यांना सातत्यानं सलत राहते.पण ते त्यामुळे कधी खचत नाहित. लोक हलाखीत जिवन जगतात.त्यांच्यावर कधी सामाजिक, तर कधी राजकिय दबावापोटी ते उघडपणे सोबत करू शकत नसतील अशी मनाला भुरळ घालून ते आपल्या कामातले सातत्य टिकवून ठेवतात. आणि लोकशाहीने मतदानाच्या माध्यमातुन दिलेल्या अधिकाराचा वापर हिच जनता या निवडणुकीत करून आपल्या मनातील खदखद मोकळी करतील. व उघडपणे सोबत न येणारी जनता गुप्तपणे मतदानाचा अधिकार वापरून मला मतदान करतील असा दुर्दम्य आशावाद त्यांना आहे.

सध्या उमेदवारी करीत असताना त्यांनी निवडणुक आयोगाला केलेला खडा सवाल एक विचारवंताच्याही डोळ्यात अंजन घालणारा आहे.

ते म्हणतात मला भारतीय निवडणूक आयोगाचा आदेश मान्य नाही. कोणता आदेश? नेमका काय आहे हा आदेश ते आपण नीट समजून घेऊया त्यांच्याच शब्दात 

    मी शिवराम मगर पाटील, जळगाव, महाराष्ट्र जागृत जनमंच.जळगांव विधानसभा मतदारसंघ_१३ मधून उमेदवारी अर्ज केला आहे.मला निवडणूक आयोगाची उमेदवाराकरीता निदेश पुस्तिका २०२३ मिळाली.त्यातील पान नंबर २६५ वर जोड पत्र २७ प्रपत्र क आहे.त्यात अशी सुचना, आदेश दिला आहे कि, उमेदवार वर जे गुन्हे किंवा खटले असतील ते त्यांनी स्वखर्चाने प्रिंट मेडिया आणि इलेक्ट्रॉनिक मेडिया वर तीन वेळा प्रसारित करावेत.असाच आदेश मला जळगाव जिल्हा निवडणूक अधिकारी कडून मिळाला आहे.जोडपत्र ४७ क.
    तो आदेश असा असा कि,माझ्यावर अमुक अमुक  गुन्हा दाखल आहे.खटला दाखल आहे. मी स्वतः खर्चाने प्रिंट मेडिया आणि इलेक्ट्रॉनिक मेडिया वर तीन वेळा प्रसिद्ध करावे.
   माझा आक्षेप आहे कि,मी माझ्यावर स्वताहून गुन्हा नोंदवला नसतांना मी  असे जाहीर का करावे?हा माझा आक्षेप आहे.जर गुन्हा नोंदवला आहे,खरा असो किंवा खोटा असो  तर नोंदवणारा तशी माहिती देऊ शकतो,प्रसिद्ध करू शकतो.पण मीच माझ्या विरोधातील खोटी माहिती का प्रसिद्ध करावी?
    असे केल्याने माझा वैयक्तिक आत्मसन्मान, सामाजिक प्रतिष्ठा बाधीत होते.माझा घटनात्मक अधिकार बाधीत होतो.
   जर मी चुकीचे कृत्य केले किंवा नाही केले आहे तरीही सरकार किंवा अन्य कोणी मला शिक्षा करू शकतो.मला फासावर देऊ शकतो.पण मी स्वतः फासावर चढून आत्महत्या का करावी?अशी आत्महत्या सदृश करण्याचा आदेश भारतीय निवडणूक आयोगाने मला लेखी स्वरूपात अधिकृत स्वरूपात दिला आहे.तो मला मान्य नाही.
   जर कोणावर बलात्काराचा किंवा खुनाचा खोटा आरोप आणि खटला दाखल असेल तर त्यांनी स्वताहून का प्रसिद्ध करावा कि,मी बलात्कार केला आहे किंवा मी खून केला आहे?
      असे करायचा आदेश करणे, बंधनकारक करणे चुकीचे आहे.
    मला संविधानाने मतदानाचा मुलभूत अधिकार दिला आहे.मला संविधानाने विधानसभा ,लोकसभा उमेदवारी करण्याचा मुलभूत अधिकार दिला आहे.जर मी या अधिकाराचा संविधानात्मक लाभ घेत असेल तर निवडणूक आयोगाने मला ब्लॅकमेल केले आहे.ते असे ,जर निवडणूक लढवायची असेल तर मी  स्वतः गुन्हेगार असल्याचे लिखीत स्वरुपात जाहीर करावे.मी केले.पण पुन्हा निवडणूक आयोग म्हणतो कि,प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मेडिया वर तीन वेळा जाहीर करावे.पैसा देऊन.शिवाय तसा पुरावा सादर करावा.
    हे असे करणे,मला मान्य नाही.म्हणून मी भारतीय निवडणूक आयोगाचा आदेश अमान्य करीत आहे.झुगारून देत आहे.निषेध करीत आहे.
   या कारणे मला विधानसभा निवडणूक लढण्यासाठी निवडणूक आयोग अधिकाराचा गैरव्यवहार करून माझी उमेदवारी किंवा माझी निवड रद्दबातल करू शकतो.किंवा मला पात्र घोषीत करू शकतो.
    भारतीय संविधानाचे मुलभूत स्वातंत्र्य,समता आणि बंधुभाव यावर सांप्रत निवडणूक आयोग गदा आणत आहे.संविधानातील निर्देश विरोधात आदेश देत आहे.ते चुकीचे आहे.ते मला मान्य नाही.
      यास्तव मी मी जिल्हा निवडणूक अधिकारी कडे लेखी पत्र देत आहे.त्यांनी स्विकारले पाहिजे.निवडणुक आयोगाला कळवून त्याचे निर्मुलन केले पाहिजे.अशी माझी विनंती आहे.
    निवडणूक आयोगाने पदसिद्ध अधिकाराचा गैरव्यवहार करून संविधानातील मला दिलेले मुलभूत आधिकाराचे उल्लंघन करणे मला मान्य नाही.

.... शिवराम मगर पाटील 
९२७०९६३१२२
१३..जळगाव शहर विधानसभा उमेदवार 
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४.

टिप्पण्या

  1. धन्यवाद सर.आपण मदत करीत आहात.निवडणुक आयुक्त चुकीचे काम करीत आहेत.मला निवडणूक लढवायची आहे म्हणून माझ्याकडून माझीच बदनामीकारक मजकूर माझ्याच विनंतीने ,माझ्याच खर्चाने करायला लावणे म्हणजे ब्लॅकमेलींग आहे.मला मान्य नाही

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

आमच्या गल्लीमैदान न्यूज वर आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा. मो. न.8999117215