अजित पवार मुख्यमंत्री होणार ? फडनाविसांचा "तो "शब्द खरा ठरण्याची चिन्हे !


मुंबई  : राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे नेते अजित पवार २०२३ च्या  सप्टेंबर /ऑक्टुंबर दरम्यान  नाराज असल्याच्या चर्चाना उधान आल होत . त्यावेळी अजित पवार यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडून केले गेले होते .  मुख्यमंत्री पदाची महत्वकांक्षा मनी बाळगणाऱ्या अजित पवार यांना ,संधी भेटेल तेव्हा 5 वर्षासाठी मुख्यमंत्री करू, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी केलं होत . त्याचबरोबर पुढील विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. सहा महिन्यासाठी कुठल्याही गोष्टी बदलत नसतात, असंही त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होत . त्या वक्तव्याचा आधार घेवून आता संधी आलेली आहे .त्यामुळे फडणवीस हे शब्दाचे पक्के असल्याने "तो " शब्द ते नक्की पाळतील.अशी अपेक्षा अजित पवार समर्थकांना असल्याने अजित पवार हे मुख्यमंत्री होतील .नव्हे तर तशी इच्छा दिल्लीस्वरांची देखील असल्याचे आतल्या गोटातून सांगितले जात आहे . 

 राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे आपल्या समर्थकांसह शिंदे - फडणवीस सत्तेत सहभागी झाल्यानंतर राज्यात मुख्यमंत्री बदल्याच्या चर्चांना जोर आला होता . परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम देत सहा महिन्यासाठी कुठल्याही गोष्टी बदलत नसतात. या कारणानं महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदल होणार नाही. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण करतील .  असं स्पष्ट करत अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या महत्त्वाकांक्षेला पूर्णविराम देत त्यावेळी एक महत्वपूर्ण विधान केल होत . अजित पवारांना मुख्यमंत्री बनवायचं असेल, तर त्यांना पूर्णकाळ काळ 5 वर्षासाठी मुख्यमंत्री बनवू, यापुढं जेव्हा कधी संधी भेटेल तेव्हा, त्यांना पाच वर्षासाठी मुख्यमंत्री करू असंही त्यांनी स्पष्ट केलं होत .

अजित पवार यांना मुख्यमंत्री केल तर शरद पवार यांचे आमदार त्यांच्याकडे येवू शकतात .परिणामी शरद पवारांचं राजकीय वादळ शमवू शकत . किवा दोन्ही राष्ट्रवादी एक होवू शकतात असा  कदाचित या मागील हेतू दिल्लीस्वरांचा आणि फडनाविसांचा असावा . मात्र यास शिंदे यांची नापसंती असल्याचे ऐकिवात येत आहे . म्हणून कदाचित शिंदेना मनविण्यात वेळ लागत असल्याने शपथविधी लांबणीवर पडलाय अशीही चर्चा आहे .

फडनाविसांच्या या त्यावेळच्या वक्तव्याचा आधार घेवून आता अजित पवारांसाठीची ती  संधी उपलब्द्ध झालेली आहे .त्यामुळे अजित पवार हे मुख्यमंत्री नक्की होतील .अशी अपेक्षा अजित पवार समर्थकांना लागून आहे .शिंदेनी जरी मुख्यमंत्री निवडीचा चेंडू दिल्लीस्वरांच्या दरबारी टाकला असला तरी त्यांनी मुख्यमंत्री  पदाचा दावा सोडला आहे असे अजिबात म्हणता येणार नाही .कारण त्यांनी फडणवीस किवा अजित पवार यांच्या नावाला समर्थन देखील दिलेले नाही .नव्हे तर त्यांचे नाव देखील संपूर्ण मुलाखतीत घेतलेले नाही .संपूर्ण मुलाखतीत अडीच वर्षात मी काय केल याचाच उल्लेख सातात्य्राने करून मी कसा मुख्यमंत्री म्हणून योग्य आहे असेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे . एकंदरीत त्यांनी घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयामुळेच महायुतीला निवडणुकीत कसा फायदा झाला हेच सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे .जर फडनाविसांचे नाव फायनल असते तर आता पर्यंत शपथविधी कधीच झाला असता .परंतु शपथविधी लाम्बण्याचे कारण हे फडनाविसानी अजित पवारांना दिलेल्या शब्दात अडकले आहे .ज्याला कदाचित शिंदेंची संमत्ती नसावी .म्हणून कदाचित हा तिढा शिंदेनी दिल्ली दरबारी टोलवून "मी का नको ? याच उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलाय का ?  अशीही शंका उपस्थित होत आहे .

खर तर मोठा धाडसाचा निर्णय घेवून शिंदेनी बंड केले .आणि त्याचे फलश्रुत म्हणून भाजपला सत्तेची फळ चाखता आली .अजित पवार यांना व त्यांच्या गटाला  गरज नसताना नंतर सत्तेत सामील करून घेतलं गेल  .खर तर अस करण्याची काहीच गरज नव्हती अस भाजपच्या कार्यकर्त्यासह अनेकांचे म्हणणे होते .नव्हे तर त्यांना घेतल्यामुळे भाजपची नाचक्की देखील झाली .कारण काही दिवसांपूर्वी खुद्द पंतप्रधान एका राज्यात अजित पवारांचे नाव घेवून ७० हजार कोटींच्या घोटाळ्याची वाच्यता करतात अन त्यानंतर आठवडा भरातच त्यांना सत्तेत सामील करून घेतात .याबद्दल भाजपची देशभर  विरोधकांनी कोंडी केली  होती .उलट अर्थी एकनाथ शिंदे यांच्या कामगिरीमुळे ,त्यांनी घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयामुळे सरकारची प्रतिमा जनामासात उजळली गेली .नव्हे तर शिंदे हे फडनाविसंपेक्षा राज्यात प्रभावी व जनसामान्यांचे नेते म्हणून त्यांची छबी निर्माण करण्यात यशस्वी ठरले .कदाचित पुन्हा ते मुख्यमंत्री झाले तर फडणवीस हे पुन्हा अधिक बकॅफुट वर जातील म्हणून कदाचित शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करणे भाजपला अन फडनाविसांना अवघड जागेचे दुखणे झाले आहे का ? अस प्रश्न देखील निर्माण होतो .

एकंदरीत यावरून असे लक्षात येते  कि ,महायुतीत कुणी कितीही काही सांगत असल तरी बिलकुल अलबेल नाही .जर शिंदे यांनी अधिक तानुनच धरल तर त्यांनाच मुख्यमंत्री म्हणून मान्यता देण्यापलीकडे भाजपला गत्यंतर राहणार नाही .शिंदे यांचे ७ खासदार आहेत .तीच मोठी ताकद त्यांची आहे .कारण केंद्रात पहिलेच भाजपचे सरकार कुबड्या घेवून स्थापन झालंय .महाराष्ट्राच्या निवडणुकीत हेही शिद्ध झालय कि घटक पक्षांना कशा पद्धतीने संपविल जात आहे .त्यामुळे देशातील सगळ्याच घटकपक्षांचे इंडिकेटर लागले आहेत . शेवटी राजकारणात काहीही होवू शकते . भीती  भाजपला देखील आहे त्यामुळे शिंदे यांना मुख्यमंत्री पद न देता मनविण्यात भाजप काही काळासाठी यशस्वी होवू शकेलही मात्र नंतर काही विपरीत घडलेच तर ? याचाही विचार भाजप नक्कीच करत असेल .बघूया  शिंदे यांचे ७ खासदार ही मोठी ताकद शिंदेंची पुन्हा त्यांना मुख्यमंत्री पदासाठी कामी येते कि ,फडनाविसांचा अजित पवारांबद्दलाचा "तो " शब्द खरा होतो .हे येणाऱ्या दिवसात समजेलच .

त्यासाठी व नियमित घडामोडींसाठी वाचत रहा आपल्या सर्वांच्या आवडीचे " गल्लीमैदान न्यूज "

 

 
 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

आमच्या गल्लीमैदान न्यूज वर आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा. मो. न.8999117215